नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच, म्हणजे कदाचित या वर्षअखेरीस पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याचे नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी बुधवारी सांगितले.

करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर भारतातून जाणारी व येथे येणारी प्रवासी विमान वाहतूक मार्च २०२० पासून स्थगीत असून, या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी भारताची २५ हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत, दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याच्या प्रक्रियेचे सरकार मूल्यमान करत असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते. जगाच्या काही भागांतील करोनाविषयक परिस्थिती लक्षात ठेवून भारत सामान्य परिस्थितीत येऊ इच्छितो, असे ते म्हणाले होते.