करोना महामारीविरुद्धच्या युद्धात देश एक मोठी कामगिरी साध्य केलीआहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार केला आहे आणि या निमित्ताने देशभरात साजरा करण्याची तयारी केली जात आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. आतापर्यंत, १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१,  ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.

भारताने करोना लसीकरणाचे १०० कोटींचा टप्पा पार करून आज इतिहास रचला आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्सव साजरा करण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत देशभरात कार्यक्रम आयोजित करून ज्यांनी लसीकरणासाठी योगदान दिले त्यांना कृतज्ञता व्यक्त केली जाईल. देशात १०० कोटी डोस देण्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री मनसुख मांडविया लाल किल्ल्यावरून गायक कैलाश खेर यांचे गाणे आणि दृकश्राव्य चित्रपट प्रदर्शित करणार आहेत.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?
Indian Basmati stolen by Pakistan
पाकिस्तानने चोरला भारताचा बासमती तांदूळ; परिस्थिती खरंच किती चिंताजनक?

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी बुधवारी लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना विलंब न करता लसीकरण करून भारताच्या ऐतिहासिक लसीकरण प्रवासात योगदान देण्याचे आवाहन केले. मांडवीया म्हणाले की, लसीचे १०० कोटी डोस दिल्यानंतर, मिशन अंतर्गत, आम्ही याची खात्री करू की ज्यांना पहिला डोस मिळाला आहे त्यांना दुसरा डोस मिळेल जेणेकरून त्यांचे कोविड -१० पासून संरक्षण सुनिश्चित होईल. केंद्र सरकारने म्हटले आहे की ज्या गावांना १००% लसीकरण करण्यात आले आहे त्यांनी १०० कोटी डोसची विक्रम साजरा करण्यासाठी या मोहिमेतील प्रमुख आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुणगान करणारे पोस्टर बॅनर लावावेत.

भारतात लसीकरणाअंतर्गत दिलेले १०० कोटी डोसचा विक्रम साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशात १०० कोटी डोस देण्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून गायक कैलाश खेर यांचे गाणे आणि दृकश्राव्य चित्रपट आरोग्य मंत्री प्रदर्शित करतील. मांडवीया यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. “देश लसीचे शतक बनवण्याच्या जवळ आहे. या सुवर्ण संधीचा एक भाग होण्यासाठी, मी देशवासियांना आवाहन करतो की ज्यांना अद्याप लसीकरण करणे बाकी आहे त्यांनी त्वरित लसीकरण करून भारताच्या या ऐतिहासिक सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विमाने, जहाजे, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर होणार घोषणा

स्पाईसजेटने गुरुवारी दिल्ली विमानतळावर १०० कोटी डोसचे ध्येय साध्य करण्याबद्दल विशेष गणवेश जारी केला आहे. यावेळी आरोग्य मंत्री, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि स्पाइसजेटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह उपस्थित राहणार आहेत. मांडवीया यांनी यापूर्वी म्हटले होते की, जेव्हा भारत लसीच्या १०० कोटी डोसचा टप्पा गाठेल, तेव्हा विमान, जहाज, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर याची घोषणा केली जाईल. हा पराक्रम गाठल्याचा आनंद शहरातील केंद्र शासकीय रुग्णालयांमध्येही साजरा केला जाईल.

लाल किल्ल्यावर देशाचा सर्वात मोठा खादी तिरंगा फडकवला जाणार

देशातील सर्वात मोठा खादी तिरंगा गुरुवारी लाल किल्ल्यावर लसीकरणाअंतर्गत दिलेले १०० कोटी डोस पूर्ण झाल्यावर फडकवला जाईल. या तिरंग्याची लांबी २२५ फूट आणि रुंदी १५० फूट आहे आणि त्याचे वजन सुमारे १,४०० किलो आहे. गांधी जयंतीला २ ऑक्टोबर रोजी लेहमध्ये हाच तिरंगा फडकवण्यात आला होता.