बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवात अज्ञात धर्माधांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले करून त्यांचा विध्वंस केला. या वेळच्या दंगलींमध्ये चार जण ठार व अनेक जण जखमी झाल्यामुळे २२ जिल्ह्य़ांमध्ये निमलष्करी दले तैनात करणे सरकारला भाग पडले, असे माध्यमांच्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. दरम्यान भारताने यावरुन नाराजी जाहीर करत हे विचलित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसंच भारतीय उच्चायुक्त आणि दूतावास सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना बांगलादेशने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या तात्काळ कारवाईची भारताने दखल घेतली असल्याची माहिती दिली.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरांवर हल्ले, चार जण ठार

या संपर्ण घटनेवर भारताची नेमकी प्रतिक्रिया काय आहे असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “बांगलादेशमधील विचलित करणारे काही रिपोर्ट आले आहेत. यामध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर हल्ला करण्यात आल्याचाही समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश सरकारने तात्काळ पावलं उचलली याची आम्ही दखल घेतली आहे. त्यांनी तिथे निमलष्करी दले तैनात केलं”.

“तसंच बांगलादेशमध्ये सुरु असलेलं दुर्गा पूजा सेलिब्रेशन हे सरकारी यंत्रणांकडून तसंच लोकांकडून मिळणाऱ्या मदतीमुळेच सुरु असल्याची दखलही आम्ही घेतली आहे. आमचे उच्यायुक्त आणि राजदूत तेथील सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय झालं –

माध्यमांच्या वृत्तांनुसार, चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्य़ात धर्माध व पोलीस यांच्यात बुधवारी झालेल्या संघर्षांत किमान ४ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. हाजीगंज येथे मेळावे आयोजित करण्यावर अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील कुमिला येथे दुर्गापूजा मंडपात ईश्वरनिंदेची कथित घटना घडल्याचे पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तथापि, धर्माधांनी कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला. धार्मिक तणाव भडकावण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करणयात आला.

हा हिंसाचार म्हणजे दुर्गापूजा उत्सव उधळून लावण्याचे कारस्थान असल्याचा आरोप करतानाच; धर्माधावर कारवाई करावी आणि हिंदू मंदिरांचे संरक्षण करावे, अशी मागणी हिंदू नेत्यांनी केली.

दुर्गापूजा थांबवण्यासाठी निदर्शने करून एका विशिष्ट गटाने पूजा मंडपात ईश्वरनिंदा केल्याचे कुमिला जिल्हा पूजा समितीच्या सचिवांनी सांगितले. लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये असे आवाहन करणारी तातडीची सूचना धार्मिक व्यवहार मंत्रालयाने जारी केली आणि धार्मिक ऐक्य व शांतता कायम राखण्याचेही आवाहन केले. बांगलादेशातील धर्माधांनी ढाक्यापासून १०० किलोमीटर अंतरावरील कुमिलातील काही भाग, लगतचे हाजीगंज व हटिया व बंसखली येथील मंदिरांवर हल्ले केल्यानंतर हिंसाचार उफाळला.