India Pakistan News Live Updates : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. तसेच पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा आता भारताने दिलेला आहे.
या सर्व घडामोडींवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पाकिस्तानला कडक इशारा दिला. भारत आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही, पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच वार केला, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरील आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भातील बातम्या आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
India Operation Sindoor Live Updates : भारत-पाकिस्तान तणाव आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
"मी म्हटलं अणूबॉम्बपेक्षा…", ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठा दावा
"इंदिरा गांधी आज हयात असत्या तर…", आसामच्या मुख्यमंत्र्याचा बांगलादेश व पीओकेच्या मुद्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल
भारताची पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई; २४ तासांत देश सोडण्याचा आदेश
नवी दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या पाकिस्तानी अधिकार्याला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे. भारतातील त्याच्या अधिकृत दर्जाच्या विरोधात असलेल्या कारवायांमध्ये सहभाग झाल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. यासंबंधी पाकिस्तान हाय कमिशनच्या चार्ज डी'अफेयर्स यांना डिमार्च जारी करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा 'तो' दावा भारताने फेटाळला; शस्त्रविरामादरम्यान दोन्ही देशांमधील चर्चांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं!
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, विजयाचा दावा करणे पाकिस्तानची जुनी सवय आहे. १९७१, १९७५ आणि १९९९ च्या कारगिल युद्धात देखील असेच करण्यात आले होते. ढोल पिटण्याची पाकिस्तानची सवय आहे. पराभूत झालो तरी ढोल वाजवतील....
पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताने मांडली थेट भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानला पुन्हा इशारा
दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही- परराष्ट्र मंत्रालय
भारत सिंधू जल करार तोपर्यंत स्थगित ठेवेल जोपर्यंत पाकिस्तान खात्रीशीर आणि ठामपणे सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापाराबाबात झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर सहमती झाली असे म्हटले होते. हा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे. तसेच स्पष्ट केले की दोन्ही देशांमधील शस्त्रविरामाचा निर्णय हा सैन्याच्या कारवाईनंतर घेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे गोळीबार आणि सैन्य कारवाई बंद करण्याबाबत सहमती होण्यापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्या नेत्यांमध्ये लष्करी कारवाई बद्दल चर्चा झाली. या कोणत्याही चर्चेमध्ये व्यापाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही
“आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे की जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत. त्या धोरणात बदल झालेला नाही. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
"भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा परिणाम एकच विनाश", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूचक इशारा
"भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला हे देखील सांगण्याचं काम केलं आहे की पाकिस्तानात अशी एकही जागा नाही की तेथे बसून दहशतवादी शांततेत श्वास घेऊ शकतात, आम्ही घरात घुसून मारू, मग वाचण्याचा एक देखील मोका आम्ही देणार नाहीत. आमच्या मिसाइल आणि ड्रोन याविषयी विचार केला तर पाकिस्तानला काही दिवस झोप सुद्धा लागणार नाही. ही हिंद की सेना आहे. आपल्या जवानांनी समोरू हल्ला केला. आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या ९ तळांना उद्ध्वस्त केलं. १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केलं. आता दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश. भारतातील निर्दोष लोकांना मारण्याचा परिणाम एकच होणार तो म्हणजे विनाश आणि महाविनाश. ज्या पाकिस्तानच्या सैन्यांच्या भरोशावर दहशतवादी बसले होते, त्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्यांनी धुळ चारली आहे", असंही मोदींनी म्हटलं आहे.
'भारत माता की जय...या घोषणेची ताकद जगाने पाहिली', पंतप्रधान मोदींकडून भारतीय जवानांचं कौतुक
"भारत माता की जय...या घोषणेची ताकद नुकतीच जगाने पाहिली. ही फक्त घोषणा नाही, तर देशातील प्रत्येक जवानांची एक शपथ आहे. जे जवान भारत मातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी जीवाची बाजी लावतात, त्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचा हा आवाज आहे. भारत माता की जय...हा आवाज मैदानात देखील घुमतो आणि मिशनमध्ये देखील घुमतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Pm Modi : "दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून…", पंतप्रधान मोदींचं ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य; जवानांचं केलं कौतुक
'जगाने एअरफोर्सची ताकद बघितली'; हवाई दलाच्या जवानांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळावर जाऊन जवानांशी संवाद साधला आहे. यावेळी मोदी म्हणाले की, 'जगाने एअरफोर्सची ताकद बघितली आहे', असं म्हणत पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या जवानांचं कौतुक केलं आहे.
"सीमा आणि नियंत्रण रेषेभोवती बंकर बांधण्याचा प्रयत्न करणार", मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती
कुपवाडा येथे सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तेथील रहिवाशांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "देवाच्या कृपेने येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अर्थातच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचं जिल्हाधिकारी मूल्यांकन करतील. त्यानंतर आम्ही त्यांना भरपाई द्यायची की नाही हे ठरवू. इम्युनिटी बंकर बनवण्यात आले होते. मात्र, आम्हाला त्यांची फार काळ गरज नव्हती. आम्ही आता सीमा आणि नियंत्रण रेषेभोवती वैयक्तिक बंकर बांधण्याचा प्रयत्न करू", असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsVIDEO | J&K CM Omar Abdullah (@OmarAbdullah) speaks to media after meeting residents affected by cross-border shelling in Kupwara:
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
“By God’s grace, we haven’t lost any lives here, but of course, there is a loss of public property. The District Collector is with us. They will do… pic.twitter.com/26e1Px1xJt
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार
ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि पाकिस्तान आणि भारतातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीरच्या शुक्रू केलर परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोध मोहीम राबवली असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत तीन कट्टर दहशतवादी ठार झाले आहेत.
https://platform.twitter.com/widgets.jsOPERATION KELLER
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 13, 2025
On 13 May 2025, based on specific intelligence of a #rashtriyasrifles Unit, about presence of terrorists in general area Shoekal Keller, #shopian, #indianarmy launched a search and destroy Operation. During the operation, terrorists opened heavy fire and fierce… pic.twitter.com/KZwIkEGiLF
Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं
आदमपूर हवाई तळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांशी साधला संवाद
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर हवाई तळावर जाऊन जवानांशी संवाद साधला आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsPHOTO | Today early morning, Prime Minister Narendra Modi (@narendramodi) went to the Adampur Air Base. He was briefed by Air Force personnel and he also interacted with our brave Jawans. pic.twitter.com/Tc4WKTh89v
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2025
पंजाबमधील पाच सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळा मंगळवारीही बंद
पंजाबच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळा मंगळवारीही बंद आहेत. तसेच अमृतसर आणि होशियारपूरच्या दसुया आणि मुकेरियन भागात खबरदारीचा उपाय म्हणून काल रात्री ब्लॅकआउट करण्यात आलं होतं, अशी माहिती देखील समोर येत आहे.
जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये परिस्थिती पूर्व पदावर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आल्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये परिस्थिती पूर्व पदावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत व पाकिस्तान यांच्या DGMO बैठकीत नेमकं काय ठरलं? दोन्ही बाजूंची कोणत्या मुद्द्यांवर सहमती झाली?
गेल्या आठवड्यात भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात एअर स्ट्राईक केल्यापासून सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये धुमश्चक्री सुरू झाली. पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले भारतानं निष्प्रभ केले. शिवाय थेट लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. अखेर पाकिस्ताननं शस्त्रविरामाचा प्रस्ताव ठेवला आणि भारतानं त्यास सहमती दर्शवली. पण शस्त्रविराम नेमका कोणत्या अटींवर केला जावा, यासाठी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये दोन वेळा चर्चा झाली. सोमवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत या अटींवर सविस्तर चर्चा झाली.
PM Modi : "…तर एक दिवस तेच पाकिस्तानचं अस्तित्व संपवतील", पंतप्रधान मोदींचा सूचक इशारा
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी सीमेवरील सैन्य कमी करण्यास सहमती दर्शविली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या भारताच्या सीमेवर ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर न्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंनी सीमेवरील सैन्य कमी करण्यास सहमती दर्शविली असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
भारतावर हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानने वापरली चीनी क्षेपणास्त्रे, महत्वाची माहिती समोर
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये चीनने पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, अशी माहिती भारताने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या सांगितली आहे. वायुसेनेचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी माध्यमांना माहिती दिली.
(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)