Pakistan Reaction After RSS leader Dattatreya Hosabale Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे पाकिस्तानबरोबरची कोंडी फोडण्यासाठी थेट जनतेशी संपर्क महत्त्वाचा आहे आणि चर्चेसाठी नेहमीच संधी उपलब्ध असली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही त्यांच्या या व्यक्तव्याला पाठिंबा दिला होता. आता पाकिस्तानकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.
होसबाळे यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
होसबाळे यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. ताहिर अंद्राबी यांनी दोन्ही देशांमध्ये संवादाच्या मागणीचे स्वागत केले. पाकिस्तानी प्रवक्ते ताहिर अंद्राबी म्हणाले, “भारतातून संवादाची मागणी करणारे आवाज येत आहेत ही निश्चितच एक सकारात्मक बाब आहे. आम्हाला आशा आहे की भारतात सामंजस्य नांदेल, भारतातील या आवाजांना सरकारकडून काही अधिकृत प्रतिसाद मिळतो का, हे आम्ही निश्चितपणे पाहू.”
“पडद्यामागील किंवा इतर कोणत्याही चर्चेची मला माहिती नाही आणि त्यावर भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. जर मी यावर भाष्य केले, तर पडद्यामागील चर्चेचा अर्थच हरवून जाईल, कारण ही एक पूर्णपणे गोपनीय प्रक्रिया आहे.” अंद्राबी असेही म्हणाले की, पाकिस्तानचा विश्वास आहे की सर्वांसाठी शांतता, सुरक्षा आणि सामायिक समृद्धी साधण्यासाठी रचनात्मक भागीदारी आणि प्रामाणिक संवाद आवश्यक आहे.
होसबाळे यांनी काय म्हटले होते?
पाकिस्तानबरोबरची कोंडी फोडण्यासाठी थेट जनतेशी संपर्क महत्त्वाचा आहे आणि चर्चेसाठी नेहमीच संधी उपलब्ध असली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले होते.
पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने भारताचा विश्वास गमावला आहे आता समाजाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे, असे होसबळे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. देशाची सुरक्षा आणि आत्मसन्मान जपला पाहिजे आणि सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. पण त्याच वेळी, संवादसेतू बंद ठेवून चालणार नाही, असे त्यांनी नमूद केले. त्याच दृष्टिकोनातून थेट जनतेशी सातत्याने संवाद साधल्यास दोन देशांमध्ये निर्माण झालेला तिढा सुटू शकेल, अशी अपेक्षा होसबळे यांनी व्यक्त केली होती.
पाकिस्तानची संपूर्ण प्रतिक्रिया काय आहे?
पाकिस्तानी प्रवक्ते ताहिर अंद्राबी म्हणाले, “पडद्यामागील किंवा इतर कोणत्याही चर्चेची मला माहिती नाही आणि त्यावर भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. जर मी यावर भाष्य केले, तर पडद्यामागील चर्चेचा अर्थच हरवून जाईल, कारण ही एक पूर्णपणे गोपनीय प्रक्रिया आहे.” अंद्राबी असेही म्हणाले की, पाकिस्तानचा विश्वास आहे की सर्वांसाठी शांतता, सुरक्षा आणि सामायिक समृद्धी साधण्यासाठी रचनात्मक भागीदारी आणि प्रामाणिक संवाद आवश्यक आहे.
“प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक सलोख्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आम्ही मुत्सद्देगिरीची तत्त्वे, सार्वभौमत्वाचा आदर आणि अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभागासाठी दृढपणे वचनबद्ध आहोत.” दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्य “कोणत्याही घातपातासाठी, गोळीबारासाठी किंवा शस्त्रसंधीच्या कोणत्याही उल्लंघनासाठी” सतर्क आहे.
भारत सरकारची भूमिका काय?
दुसरीकडे, भारत सरकारकडून अद्याप या विषयावर कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही.
