scorecardresearch

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाजवळ पोहोचले होते…;अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही तयारी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाजवळ पोहोचले होते…;अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचा दावा
माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो ( Reuters/File Photo)

वॉशिंग्टन : २०१९च्या फेब्रुवारी महिन्यात बालाकोट हल्ल्यानंतर भारताने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर दोन्ही देश अणूयुद्धाजवळ पोहोचले होते, असा दावा अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी केला आहे.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने अणूहल्ल्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यासाठी भारताच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला झोपेतून उठविले होते, असे ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या  पुस्तकात पॉम्पियो यांनी लिहिले आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही तयारी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ‘अणूयुद्ध खूप जवळ येऊन ठेपले होते, इतकेच मला माहिती होते’, असे पॉम्पियो यांनी  म्हटले आहे.

‘सर्जिकल स्ट्राइक’च्या पुराव्याची गरज नाही : राहुल गांधी

जम्मू : ‘सर्जिकल स्ट्राइक’प्रकरणी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी  काँग्रेस पक्ष सहमत नाही. सशस्त्र दलांनी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. दिग्विजय सिंह यांचे विधान  बिनबुडाचे आहे, असे  राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 02:20 IST

संबंधित बातम्या