scorecardresearch

मोठी बातमी! युगांडात भारतीय खेळाडू थांबलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट; सुवर्णपदक विजेता खेळाडूही उपस्थित

युगांडा येथे भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीम राहत असलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत

India para badminton players, Uganda, Uganda Para-Badminton International competition,
युगांडा येथे भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीम राहत असलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत (Photo: Twitter)

युगांडा येथे भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीम राहत असलेल्या हॉटेलबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. या बॉम्बस्फोटात काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान भारतीय खेळाडू सुरक्षित असून त्यांना कोणतीही हानी झालेली नाही. समन्वय साधत हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

भारतीय पॅरा-बॅडमिंटन टीम युगांडा पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिथे उपस्थित आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तेथून फक्त १०० मीटर अंतरावर एक बॉम्बस्फोट झाला. दरम्यान भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती भारतीय पॅरा-बॅडमिंटनने दिली आहे.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगतदेखील युगांडात आहे. त्याच्यासोबत मानसी जोशी आणि मनोज सरकार हे खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत. टोक्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे गौरव खन्नादेखील संघासोबत आहेत.

“येथे बॉम्बस्फोट झाला असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. आमच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही. थोडा गोंधळ उडाला होता, पण सर्वजण सुरक्षित आहेत. स्पर्धा ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे,” अशी माहिती प्रमोद भगतने पीटीआयशी बोलताना दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 11:22 IST

संबंधित बातम्या