Visa Free Countries for Indians 2025: विदेश वारी हे अनेकांचं स्वप्न असतं. फिरायला जाण्यासाठी इतर देशांचा पर्याय चर्चेला येत असतो. पण अशा दौऱ्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता हे मोठं जिकिरीचं काम ठरतं. विशेषत: त्या त्या देशात जाण्यासाठी मिळवावा लागणारा व्हिसा ही प्रचंड वेळखाऊ आणि ताण निर्माण करणारी प्रक्रिया ठरते. मात्र, असं असलं तरी आपल्या पासपोर्टनुसार आपल्याला काही विशिष्ट देशांमध्ये कोणत्याही व्हिसाशिवाय जाण्याची परवानगी असते. आपल्या देशाच्या पासपोर्टचं रँकिंग जसं असेल, त्यानुसार या सुविधेचा लाभ आपल्याला घेता येतो.

कशी मिळते ही सुविधा?

प्रत्येक देशाच्या पासपोर्टचं निश्चित असं आंतरराष्ट्रीय रँकिंग असतं. दरवर्षी या रँकिंगमध्ये बदल होत असतात. त्यानुसार त्या देशाच्या नागरिकांना किती आणि कोणत्या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार हे ठरत असतं. नुकत्याच जाहीर झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचं रँकिंग ८० वरून ८१ वर घसरलं आहे. त्यामुळे भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणाऱ्या देशांची यादीच बदल झाले असून आता भारतीयांना फक्त ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणं शक्य आहे.

भारताच्या पासपोर्ट रँकिंगनुसार ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास शक्य असला, तरी त्यात यूके, युरोप किंवा अमेरिका हे तीन सर्वाधिक प्राधान्य असणारे देश मात्र नाहीत. पण त्याशिवाय, मॉरिशस आणि इंडोनेशिया हे पर्यटनासाठीचे प्रमुख पर्याय मात्र या यादीत आहेत. याशिवाय लाओस, फिजी, मादागास्कर अशा इतरही पर्यटनच्या दृष्टीने महत्त्वाच्या देशांचा यादीत समावेश आहे. याव्यतिरिक्त केनिया, झिम्बाब्वे, ओशियानिया, मायक्रोनेशिया, पलाऊ बेटं आणि वनातू अशा देशांचाही यात समावेश आहे.

भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नसणारे देश…

१. अंगोला
२. बार्बाडोस
३. भूतान
४. बोलिव्हिया
५. ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स
६. बुरुंडी
७. कंबोडिया
८. केप वर्दे आयलँड्स
९. कोमोरो आयलँड्स
१०. कूक आयलँड्स
११. दिजीबोरी
१२. डोमिनिका
१३. इथिओपिया
१४. फिजी
१५. ग्रेनाडा
१६. गिनी बिसाऊ
१७. हैती
१८. इंडोनेशिया
१९. इराण
२०. जमैका
२१. जॉर्डन
२२. कझाकिस्तान
२३. केनिया
२४. किरीबाती
२५. लाओस
२६. मकाओ
२७. मादागास्कर
२८. मलेशिया
२९. मालदीव
३०. मार्शल आयलँड्स
३१. मॉरिशियस
३२. मायक्रोनेशिया
३३. मंगोलिया
३४. मॉन्टसेरॅट
३५. मोझाम्बिक
३६. म्यानमार
३७. नामिबिया
३८. नेपाळ
३९. निऊ
४०. पलाऊ आयलँड्स
४१. कतार
४२. रवांडा
४३. समोआ
४४. सेनेगल
४५. सेचेलस
४६. सिएरा लिओने
४७. सोमालिया
४८. श्रीलंका
४९. सेंट किट्स अँड नेव्हिस
५०. सेंट लुसिया
५१. सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडाईन्स
५२. टांझानिया
५३. थायलंड
५४. तिमोर लेस्टे
५५. त्रिनिदाद अँड टोबॅगो
५६. तुवालू
५७. वनाऊतू
५८. झिम्बाब्वे