जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनकडे पाहिलं जातं. मात्र भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं आहे. ब्लूमबर्गने वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या (World Population Review ) अंदाजाचा हवाला देत हे म्हटलं आहे. World Population Review ही जनगणनेवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र संस्था आहे.

World Population Review या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार २०२२ च्या शेवटापर्यंत भारताची लोकसंख्या १.४१७ बिलियन म्हणजे सुमारे १४१ कोटींहून अधिक होती. ही संख्या मंगळवारी चीनने सादर केलेल्या अहवालापेक्षा ५० मिलियनने जास्त आहे. चीनने जो अहवाल दिला त्यात त्यांची लोकसंख्या १.४१२ बिलियन असल्याचं म्हटलं आहे.

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?
mukesh ambani and gautam adani
चीनच्या बीजिंगपेक्षा मुंबईत सर्वाधिक अब्जाधिश, जागतिक श्रीमंतांच्या यादीत भारताची स्थिती काय?

भारतात ३० वर्षांखालील लोकसंख्या सर्वाधिक

भारतातली जी वाढती लोकसंख्या आहे त्यातला एक मोठा भाग ३० वर्षांखालील आहे. येत्या वर्षांमध्ये जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेचा भाग हे सगळे लोक होणार आहेत. भारताची लोकसंख्या एप्रिल २०२३ पर्यंत १४३ कोटींच्या पुढे जाईल. त्यामुळे भारताने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत कधीच मागे टाकलं आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. २०२२ मध्ये जगभरात १३ कोटी मुलांचा जन्म झाला. त्यातली अडीच कोटी मुलं एकट्या भारतात जन्माला आली आहेत. चीनमध्ये ही संख्या काही लाखांच्या घरात होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीन सध्या वाढलेल्या लोकसंख्येच्या गंभीर समस्येशी झुंज देतो आहे. चीन मध्ये गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये १.४१ बिलियल लोक होते. २०२१ च्या शेवटाच्या तुलनेत ही संख्या साडेआठ लाखांनी कमी होती. १९६१ नंतर पहिल्यांदाच चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. चीमध्ये २०२२ या वर्षात ९० लाख ५६ हजार मुलांचा जन्म झाला. तर १ कोटी ४१ हजार लोकांचा चीनमध्ये गेल्या वर्षी मृत्यू झाला.

लोकसंख्या घटू लागल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का?

चीनमध्ये लोकसंख्या घटू लागली आहे त्यामुळे आर्थिक स्तरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चीनमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे. तर वयस्कर झालेल्या लोकांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे येत्या काळात चीमध्ये काम करणाऱ्या आणि अर्थचक्राला गती देणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली असेल. याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होईल यात काहीही शंका नाही.

करोनामुळे एक महिन्यात ६० हजार मृत्यू

लोकसंख्येबाबत चीनला दिलासा मिळाला असला तरी करोनोच्या नव्या लाटेमुळे चीनचे कंबरडे मोडले आहे. शून्य करोना धोरण राबविल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये चीनने निर्बंधात शिथीलता आणली आणि त्यानंतर पुन्हा एकदा देशात करोनाचा प्रताप दिसू लागला. गेल्या ३५ ते ४० दिवसांत चीनमध्ये अधिकृत ६० हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.