अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत पाकिस्तान, श्रीलंकेच्याही मागे; जागतिक क्रमवारीत ७१व्या स्थानावर

एकूण ५७.२ गुणांसह ११३ देशांच्या जीएफएस निर्देशांक -२०२१ मध्ये भारत ७१ व्या स्थानावर आहे.

India ranks 71st global food security index 2021 behind Pakistan sri lanka
(प्रातिनिधीक छायाचित्र – पीटीआय)

एका अहवालानुसार, ११३ देशांच्या ग्लोबल फूड सिक्युरिटी (जीएफएस) निर्देशांक २०२१ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर आहे. एकूण गुणांच्या बाबतीत भारताने दक्षिण आशियात सर्वोत्तम स्थान मिळवले आहे पण अन्न सुरक्षेच्या बाबतीत बाबतीत शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापेक्षा मागे आहे. अन्न सुरक्षेच्या श्रेणीमध्ये पाकिस्तानने (५२.६ गुणांसह) भारतापेक्षा (५०.२ गुण) चांगले गुण मिळवले आहेत.

 इकॉनॉमिस्ट इम्पॅक्ट आणि कॉर्टेवा अ‍ॅग्रीसायन्सने मंगळवारी जारी केलेल्या जागतिक अहवालात म्हटले आहे की, जीएफएस इंडेक्स -२०२१ च्या या श्रेणीमध्ये ६२.९ गुणांसह श्रीलंकेने आणखी चांगली कामगिरी केली आहे. आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि अमेरिका यांनी ७७.८ ते ८० गुणांच्या एकूण जीएफएस निर्देशांकात अव्वल स्थान सामायिक मिळवले आहे.

जीएफएस निर्देशांक २०३० पर्यंत शून्य उपासमारीच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी आवश्यक प्रणालीगत दोषांकडे लक्ष वेधतो. जीएफएस इंडेक्स ११३ देशांमध्ये अन्न सुरक्षेच्या मूलभूत घटकांचे मोजमाप करते, जे परवडण्या योग्यता, उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधने आणि लवचिकता यासारख्या घटकांवर आधारित आहे.

अहवालानुसार, एकूण ५७.२ गुणांसह ११३ देशांच्या जीएफएस निर्देशांक -२०२१ मध्ये भारत ७१ व्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान (७५ व्या), श्रीलंका (७७ व्या), नेपाळ (७९ व्या) आणि बांगलादेश (८४ व्या) स्थानावर आहे. भारत चीनपेक्षाही (३४ व्या स्थानी) खूप मागे आहे.

अहवालात म्हटले आहे की अन्न उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अन्न उत्पादनासाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भारताने जीएफएस निर्देशांक २०२१ मध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा चांगले गुण मिळवले. तर, गेल्या १० वर्षांमध्ये संयुक्त अन्न सुरक्षा स्कोअरमध्ये भारताचा वाढता नफा पाकिस्तान नेपाळ आणि बांगलादेशच्या मागे होता.

दरम्यान, याआधीही जागतिक भूक निर्देशांक (global hunger index)  २०२१ मध्ये भारत ११६ देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२० मध्ये भारत या यादीत ९४व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India ranks 71st global food security index 2021 behind pakistan sri lanka abn

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या