देशभरात करोना संसर्गाचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर सुरू आहे. एकीकडे करोनाचे संकट असताना दुसरीकडे ओमायक्रॉन बाधितही आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तसेच सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची देखील अमलबजावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशभरात २४ तासांमध्ये आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांपेक्षाही जास्त दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज आढळलेली कोरनाबाधितांची संख्या ही कालच्या रूग्ण संख्येपक्षा २ हजार ३६९ रूग्णांनी जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, मागील २४ तासात ३१४ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झालेली आहे. १ लाख ३८ हजार ३३१ रूग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत.

देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १५ लाख ५० हजार ३७७ आहे. तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा १६.२८ टक्के आहे. तसेच, ७ हजार ७४३ ओमायक्रॉनबाधितांची देखील नोंद झालेली आहे.

१५ जानेवारीपर्यंत देशभरात ७०,२४,४८,८३८ नमुने तपासले गेले आहेत. तर, काल यापैकी १६,६५,४०४ नमूने तपासण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India reports 271202 covid cases 314 deaths in the last 24 hours msr
First published on: 16-01-2022 at 10:13 IST