India Representative Developing Countries External Affairs Minister Jaishankar ysh 95 | Loksatta

सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारत व ब्राझील यांना पाठिंबा दिला.

सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारत व ब्राझील यांना पाठिंबा दिला. या सदस्यत्वासाठी उभय देश सुयोग्य असल्याचे सांगून हे दोन्ही देश जागतिक स्तरावरील महत्त्वाची भूमिका बजावणारे असल्याचे रशियाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७७ व्या सत्रादरम्यान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शनिवारी सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवला.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणाच्या अवघ्या तासापूर्वी आमसभेला संबोधित करताना, लावरोव म्हणाले, की संयुक्त राष्ट्रे आणि सुरक्षा परिषदेने समकालीन वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांना सुयोग्य प्रतिनिधित्व दिले जावे. जेणेकरून सुरक्षा परिषद अधिक लोकशाहीवादी बनावी, अशी रशियाची अपेक्षा आहे. भारत आणि ब्राझील ही जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणारी राष्ट्रे असून सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी सुयोग्य देश आहेत. तसेच आफ्रिका खंडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशाची एकमताने आणि प्राधान्याने निवड व्हावी, असे रशियाला वाटते.

परिषदेची सद्यस्थिती

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेसाठी भारत दीर्घकाळापासून आग्रही आहे. सुरक्षा परिषदेत सध्या पाच स्थायी सदस्य आणि आमसभेद्वारे दोन वर्षांसाठी निवडले जाणारे दहा अस्थायी सदस्य देश आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका हे पाच देश स्थायी सदस्य आहेत. महत्त्वाच्या ठरावांवर हे देश आपला नकाराधिकार (व्हेटो) वापरू शकतात.  समकालीन जगाचे वास्तव सुरक्षा परिषदेत प्रतिबिंबित होण्यासाठी आणि प्रतिनिधित्व व्यापक होण्यासाठी या परिषदेवरील स्थायी सदस्य देशांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

‘भारत विकसनशील देशांचा आवाज’

न्यूयॉर्क : ‘‘जागतिक पातळीवरील सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात भारताला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत हा जणू विकसनशील देशांचा आवाज’ बनला आहे,’’ असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विकसनशील देशांतर्फे भारत नेहमीच आवाज उठवतो. त्यांच्या ज्वलंत समस्यांकडे जगाचे लक्ष वेधत असतो, असेही त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभा सत्राला संबोधित करून, आपला न्यूयॉर्क दौरा संपवला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पंजाब विधानसभेच्या अधिवेशनास अखेर राज्यपालांचा होकार

संबंधित बातम्या

“ब्राह्मणांनो परिसर सोडा आणि शाखेत…”, ‘जेएनयू’मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणांनी भिंती रंगल्या, चौकशी सुरू
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
Video: पंतप्रधान मोदींनी पुन्हा थांबवला रुग्णवाहिकेसाठी ताफा, हिमाचलनंतर गुजरातमधील घटना; काँग्रेसनं ‘तो’ व्हिडीओ शेअर करत फेटाळला दावा!
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करच्या पाऊलखुणा, ट्विट करत म्हणाली, ” राहुल गांधी सर्वांची…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी जाड असल्याचा फोटो…” कान्ये वेस्टचं ट्विटर अकाउंट निलंबित केल्यावर एलॉन मस्क यांचा मोठा खुलासा
३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगली कुत्र्याची जंगी बर्थडे पार्टी, सोन्याचे बक्षिसंही मिळाले, Viral Video पाहून म्हणाल, ‘यालाच म्हणतात नशीब’
“रील टू रिअल…” विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरची पहिली पोस्ट
मुंबई: ‘त्यांना’ मिळणार कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने; कुणाला, का आणि कशासाठी मिळणार ही वाहने वाचा…
पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?