नवी दिल्ली : भारतात या वर्षी कोळशाची आयात ऑगस्टमध्ये २.५ टक्क्य़ांनी घटली असून ती १५.२२ मेट्रिक टन इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही आयात १५.६४ मेट्रिक टन होती. 

एमजंक्शन सव्‍‌र्हिसेस या संस्थेने जमवलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२१ मध्ये कोळशाची आयात १५.२२ मेट्रिक टन झाली. ती ऑगस्ट २०२० च्या तुलनेत २.७ टक्क्य़ांनी घटली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय वर्मा यांनी सांगितले की, सागरी कोळशाचा पुरवठा वाढल्याने ही आयात कमी झाली असावी. आयातीला पर्याय म्हणून सागरी कोळशाचा मार्ग शोधून काढण्यात आला होता. ऊर्जा क्षेत्रात वाढ होत मागणी अधिक असतानाही भारताची आयात मात्र कमी होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोळशाच्या किमतीत चढउतार होत असून ऑगस्ट २०२१ मध्ये विशिष्ट प्रकारच्या कोळशाची ९.०८ मेट्रिक टन आयात झाली, तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही आयात १०.३० मेट्रिक टन होती. कोकिंग कोल हा वेगळ्या प्रकारचा कोळसा असतो त्याची आयात ऑगस्ट २०२० मध्ये ३.१७ मेट्रिक टन होती ती आता ४.३७ मेट्रिक टन  झाली आहे.

भारतात ऑगस्ट २०२१ मध्ये अनेक बंदरांवर कोळशाची आयात जुलै २०२१ मध्ये ६.७१ टक्क्य़ांनी घटली होती. जुलैत आयात १६.३१ मेट्रिक टन होती. एप्रिल- ऑगस्ट २०२१ दरम्यान कोळशाची आयात ९२.४९ मेट्रिक टन होती ती एप्रिल -ऑगस्ट २०२० या काळात ५१.२३ मेट्रिक टन होती. कोकिंग कोळशाची आयात यंदा २२.१९ मेट्रिक टन तर गेल्यावर्षी १४.३८ मेट्रिक टन होती.

कोल इंडियाने असे म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोळशाचे भाव वाढत असताना आयात करणे योग्य नव्हते. कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, काही  खाणी पावसाच्या पाण्याने बंद झाल्या आहेत. त्यामुळे कोळशाचा पेचप्रसंग निर्माण झाला.

देशात वीज वापरात वाढ

नवी दिल्ली : भारतात विजेचा वापर ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात ५७.२२ अब्ज युनिट झाला आहे. वीज वापरात वाढ  झाली असून ती ३.३५ टक्के आहे, असे ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

गेल्या वर्षी १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ५५.३६ अब्ज युनिट इतका विजेचा वापर  होता. २०१९ मध्ये तो ४९.६६ अब्ज युनिट इतका होता. आताच्या माहितीवरून असे स्पष्ट होत आहे, की विजेच्या वापरात वाढ झाली असून देशात विजेची मागणी वाढली आहे. ऊर्जा प्रकल्पात कोळशाची टंचाई असतानाही ही वाढ झाली आहे. ७ ऑक्टोबर रोजी ११,६२६ मेगावॉट इतकी विजेची कमतरता होती, ती १५ ऑक्टोबरला ९८६ मेगावॉट झाली. ७ ऑक्टोबरला विजेची टंचाई ११,६२६ मेगावॉट  होती. याचा अर्थ या महिन्याच्या पहिल्या टप्प्यात ती जास्त होती.

केंद्रीय वीज प्रकल्प प्राधिकरण कोळसा साठय़ावर देखरेख करीत असून एकूण १३५ प्रकल्प आहेत. त्यात चार दिवस पुरेल इतका कोळसा असलेल्या प्रकल्पांची संख्या ८ ऑक्टोबरला  ६९ वरून ६४ झाली आहे. कोळशाच्या कमी पुरवठय़ामुळे विजेची निर्मिती क्षमता १३ ऑक्टोबरला ११ गिगॅवम्ॉट असताना ती १४ ऑक्टोबरला ५ गिगॅवॉट  झाली होती. कोळसा पुरवठा वाढवण्यात येत असून विजेच्या मागणीत व पुरवठय़ात वाढ झाली आहे. करोना काळातील टाळेबंदी उठल्याने आता विजेची मागणी वाढली आहे.