‘ब्राह्मोस क्रूझ’ची चाचणी यशस्वी

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी नौदलाच्या आयएनएस कोलकाता या विनाशिकेवरून घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० कि.मी. आहे.

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी नौदलाच्या आयएनएस कोलकाता या विनाशिकेवरून घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० कि.मी. आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले व ते कुठल्याही दोषाविना पार पडले. आयएनएस कोलकाता ही विनाशिका १६ ऑगस्ट २०१४ रोजी कार्यान्वित करण्यात आली. जास्त संख्येने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे सोडण्याची क्षमता या विनाशिकेत आहे.
साधारण जहाजावरून आठ क्षेपणास्त्रे सोडण्यात येतात, तर आयएनएस कोलकाता या विनाशिकेवरून १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे सोडता येतात. अशा आणखी दोन विनाशिका नौदलात दाखल करण्यात येणार आहेत. तीनही विनाशिकांवरून सरळ वरच्या दिशेने सुटणारी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे सोडण्यात येतील. युनिव्हर्सल व्हर्टिकल लाँचरच्या मदतीने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे सोडता येतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India successfully tests brahmos supersonic cruise missile