बहुप्रतीक्षित आयएनएस विक्रमादित्य ही २.३ अब्ज डॉलर किमतीची विमानवाहू नौका शनिवारी येथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने भारताच्या सागरी सामर्थ्यांत वाढ होणार आहे.
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन आणि भारत व रशियातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांच्या हस्ते सदर नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहे.
सेव्हमॅस शिपयार्ड या रशियाच्या आण्विक पाणबुडी बांधणी केंद्राच्या इमारतीमध्ये सदर विमानवाहू नौका भारतीय ताफ्यात दाखल होणार आहे. सदर नौका ४४ हजार ५०० टन वजनाची आणि २८४ मीटर लांबीची आहे. मिग-२९के, कामोव्ह-३१ आणि कामोव्ह-२८ पाणबुडीविरोधी यंत्रणा यांनी ही नौका सुसज्ज आहे.