बंगळूरु : २०३० सालापर्यंत जगात हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे कुख्यात वैशिष्टय़ भारताच्या वाटय़ाला येणार असून, दर चौथा मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांमुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी दिला. या संकटाला तोंड देण्यासाठी ताण व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी आत्मसात करण्यासह समग्र एकात्मिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन येथील ‘श्री जयदेव इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’चे संचालक  मंजुनाथ यांनी ‘एचएएल मेडिकॉन २०२२’ला संबोधित करताना केले. हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि.मधील डॉक्टरांसाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.