दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेलं 'हे' शस्त्र लवकरच अमेरिकेकडून भारताला मिळणार | india will soon receive new weapon, which has been leathal against terrorist actions | Loksatta

दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेलं ‘हे’ शस्त्र लवकरच अमेरिकेकडून भारताला मिळणार

गेल्या तीन वर्षात चीनच्या आक्रमक धोरणांमुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेता भारत आणि अमेरिका दरम्यान लवकरच ड्रोनबाबत करार होण्याची शक्यता

MQ-9B predator, US India, Drone, Combat Drone, weapon, terrorist actions
दहशतवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेलं 'हे' शस्त्र लवकरच अमेरिकेकडून भारताला मिळणार ( image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये लष्करापासून ते पोलीस विभागापर्यंत ड्रोनचा वापर केला आहेत. विशेषतः काही प्रमुख देशांचा भर हा लष्करी वापरासाठी तेही सशस्त्र ड्रोनच्या वापरावर राहिला आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये तर लढाऊ विमानांप्रमाणे ड्रोनची स्वतंत्र स्कॉड्रन आहेत.

अमेरिका ही सध्या ड्रोनच्या लष्करी वापराबाबत जगात अग्रेसर असून दहशतवादी विरोधातल्या कारवाईबाबत विविध प्रकारचे ड्रोन हेच त्यांचे प्रमुख अस्त्र राहीलं आहे. चीनही ड्रोनच्या वापराबाबत अमेरिकेशी बरोबरी करु पाहत आहे. गेल्या तीन वर्षातले चीनचे आक्रमक धोरण लक्षात घेता भारताला नव्या सशस्त्र ड्रोनची आवश्यकता जास्त भासू लागली आहे.

MQ-9B predator

भारताला हवी आहेत MQ-9B predator सशस्त्र ड्रोन

भारत अमेरिकेकडून गेली काही वर्षे ड्रोन घेण्याबाबत चर्चा करत आहे.सतेव्हा दोन MQ-9 Reaper हे ड्रोन अमेरिकने प्रायोगिक वापर करायला भारतीय नौदलाकडे सूपुर्त केली आहेत. भाडे तत्तावर त्याचा सध्या वापर करत असून लवकरच हे ड्रोन अमेरिकेला परत केले जाणार आहे.

मात्र गेल्या काही दिवसांतील चर्चेनंतर MQ-9B predator हे सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून घेण्याबाबत आता शिक्कामोर्तब झालं आहे. अशी एकूण ३० ड्रोन भारत घेणार आहे. लष्कर,नौदल आणि वायू दल यांना प्रत्येकी १० ड्रोन देण्याचे नियोजन आहे. या सर्व करार तीन अब्ज डॉर्लसच्या घरात असेल.

सध्या भारताकडे इस्त्राईल बनावटीची IAI Eitan, IAI Heron, IAI Searcher तर स्वदेशी बनावटीचे DRDO Lakshya ड्रोन वापरले जात आहे. मात्र अमेरिकेकडून घेतले जाऊ शकणारे MQ-9B predator हे वर उल्लेख केलेल्या सर्व ड्रोनपेक्षा वरचढ असणार आहे.

MQ-9B predator ची वैशिष्ट्ये काय आहेत

जमीन आणि हवेतील लक्ष्यावर नजर ठेवत सलग १४ तास टेहेळणी करत उड्डाण करण्याची क्षमता हे या ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसंच एका दमात १८०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमात यामध्ये आहे. हवेतून हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब टाकण्यााची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. तसंच जास्तीत जास्त ४८० किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याचे कौशल्य या ड्रोनमध्ये असल्याने MQ-9B predator हे सध्याच्या काळातील सर्वात घातक ड्रोन समजले जाते.

अशा ड्रोनमुळे चीनच्या सीमेवर तसंच विस्तृत समुद्री क्षेत्रावर नजर ठेवणे आणि वेळ प्रसंगी हल्ला करणे शक्य होणार आहे.तेव्हा अमेरिकेकडून MQ-9B predator ड्रोन घेण्याबाबत चर्चा पूर्ण करणे करार करणे हे किती लवकरात लवकर होणे हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:01 IST
Next Story
IND vs NZ 3rd T20: जय शाह आणि आशिष शेलारांसोबत पाहिला सामना, तर सचिनशी रंगल्या गप्पा; रोहित पवारांचा अनोखा अंदाज