केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. देशभरातील तरुण आक्रमक झाले असून रसत्यावर उतरत निर्देशने करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय हवाई दल विभागाने या योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तरुणांचा या भरतीला मोठा प्रतिसाद असून केवळ ३ दिवसांमध्ये ५६ हजारापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा – भाजपाला हरवण्याची क्षमता समाजवादी पार्टीत नाही- असदुद्दीन ओवैसी

अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाकडून २४ जून २०२२ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार हवाई दलात नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन हवाई दलाकडून करण्यात आले आहे.

चार वर्षांसाठी अग्निविरांची भरती
अग्निपथ योजनेअंतर्गत १७ ते २१ वर्षाच्या तरुणांना चार वर्षाच्या सेवेसाठी भारतीय लष्करात दाखल केले जाईल. चार वर्षानंतर २५ टक्के अग्निविरांना नियमित सेवेत दाखल केले जाणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर बाहेर पडणाऱ्या अग्निविरांना केंद्रीय सशस्त्र दल तसंच आसाम रायफल्समध्ये प्राथमिकता दिली जाणार आहे. भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी राज्य पोलीस दलात प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. तसेच द्योजकांनीदेखील अग्निवीरांना नोकरीत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा- Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

देशभरात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन
अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने करण्यात आली होती. बिहार, उत्तप प्रदेश सारख्या राज्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या राज्यांमधील तरुणांनी रेल्वेच्या डब्यांना आगी लावत तोडफोड केल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच कॉग्रेसकडूनही ही योजना मागे घेण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात आले होते. मात्र, तिनही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत ही योजना मागे घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते.