वॉशिंग्टन : भारतीय -अमेरिकी मुलगी नताशा पेरी  अमेरिकी विद्यापीठाच्या सॅट व अ‍ॅक्ट या प्रमाणित चाचण्यांमध्ये चमकली असून ती सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली. तिचे वय अवघे अकरा वर्षे आहे.

स्कोलेस्टिक असेसमेंट टेस्ट व अमेरिकन कॉलेज टेस्टिंग म्हणझे सॅट व अ‍ॅक्ट या परीक्षांचा उद्देश हा मुलांना महाविद्यालयात प्रवेश देण्याची निवड चाचणी हा आहे. काही कंपन्याही या परीक्षांतील गुणांवरून संबंधित हुशार विद्यार्थ्यांंना काम देऊ शकतात. स्वयंसेवी संस्थाही त्यांच्या हुशारीचा उपयोग करून घेऊ शकतात. महाविद्यालयात प्रवेशासाठी सॅट किंवा अ‍ॅक्ट या परीक्षा द्याव्या लागतात. त्यातील गुण हे विद्यापीठातील प्रवेशासाठीही ग्रा धरले जातात. पेरी ही न्यूजर्सीतील  थेलमा एल, स्टँडमियर एलेमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी असून तिने सॅट, अ‍ॅक्ट व हॉपकिन्स विद्यापीठाच्या सीटीवाय परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे. ८४ देशांतील १९ हजार विद्यार्थ्यांंनी सीटीवाय परीक्षा दिली होती. २०२१ मध्ये पेरी हिने जॉन हॉपकिन्स टॅलेंट सर्च चाचणी दिली होती त्यावेळी ती पाचवीत होती. पेरी हिने सांगितले की, जे आर आर टोलकिन यांच्या कादंबऱ्या तिने वाचल्या होत्या. तसेच तिला वाचनाची आवड आहे.