भारत सरकार येत्या दोन ते तीन वर्षात भारतीय सैनिकांची संख्या दोन लाखांनी कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती संरक्षण मंत्र्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने आणि सैन्याच्या वाढत्या पेंशनवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने ही सैन्य कपात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – “मी स्वतः पंढरपुरात जाणार आणि…”, हिंदू मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी आक्रमक

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य येत्या दोन ते तीन वर्षांत १२.७० लाख सैनिकांपैकी सुमारे २ लाख सैन्यकपात करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय सैन्याला आधुनिक बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, सैन्यांचे पगार आणि वाढत्या पेंशनमुळे अनेक समस्या उद्भवत असल्याने ही सैन्यकपात करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! सीबीआयने अनुब्रत मंडल यांना केली अटक, जाणून घ्या नेमकं कारण काय?

सैन्यावरील वाढत्या पेंशनचा भार कमी करण्यासाठी जून महिन्यात अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेमुळे बराच वाद निर्माण झाला. आधीच कोविडमुळे सैन्य भरती न झाल्याने सैन्याला १ लाख सैनिकांची गरज भासत आहे. तर दरवर्षी ६० हजार सैनिक हे निवृत्त होत आहे. दरम्यान, यावर्षी अग्निपथ योजनेंतर्गत सुमारे ३५ ते ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.