रस्त्यावरून जाता-येता सिगरेट ओढणारा कोणी दिसला की, त्याला मध्येच अडवून सिगरेट न पिण्याचे आवाहन करण्याचे आणि त्यांना सिगरेटच्या व्यसनातून बाहेर करण्याचे निस्पृह कार्य हाती घेतलेला एक अवलिया कालवश झाला़  हा भारतीय समाजसेवक दुबईतील रुग्णालयात फुप्फुसाच्या कर्करोगाने आजारी होता़ अब्राहम सॅम्युअल (५३) असे त्यांचे नाव असून ते ‘सिगरेट खेच्या (स्नॅचर)’ म्हणूनच ओळखले जात होत़े  त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला़  त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आह़े  अब्राहम गेली सुमारे ३५ वर्षे दिवसाला दोन पाकिटे सिगरेट ओढत होत़े  त्यांना फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे २०१०मध्ये निष्पन्न झाले होत़े  त्यानंतर त्यांनी हे व्यसन सोडून दिले आणि इतरांनाही अनुभवाचे बोल ऐकविण्यास ते बाहेर पडले होत़े  
उद्याने, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणाऱ्यांना गाठून ते या व्यसनातून बाहेर पडण्याचे आर्जव करीत असत़  त्यामुळे हळूहळू त्यांना ‘सिगरेट खेच्या’ असे नाव पडले, असे गल्फ न्यूजने म्हटले आह़े  कोणालाही सिगरेट ओढताना पाहिले की, मी तेथे त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सिगरेट सोडण्यास सांगतो़  लोकांना नेहमीच हे आवडत नाही़  परंतु, त्यांना धुम्रपानाच्या परिणामांची कल्पना आणून देण्यासाठी मग मी माझा सदरा वर करतो आणि माझ्यावर झालेल्या किरणोत्सर्ग उपचाराचे व्रण दाखवितो़, असे अब्राहम यांनी एका मुलाखतीत म्हटले होत़े