भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने कारवाई करत आंतरराष्ट्रीय सागरी तस्करांचा डाव उधळून लावला आहे. या संयुक्त कारवाईत इराणी बोटीसह ५२६ किलो हेरॉईन आणि मेथाम्फेटाइन हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत इराणी बोटीसह ३ हजार कोटींचे ड्रग्जही जप्त करण्यात आले आहेत. तसंच बोटीवरच्या पाचही पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लक्षद्वीप जवळच्या सागरी हद्दीतून अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती भारतीय तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने हवाई आणि सागरी पाळत वाढवली होती. एक संशयित इराणी बोट सागरी हद्दीच्या दिशेने येत असल्याचं स्पष्ट होताच ही कारवाई करण्यात आली.

जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आणि अटक करण्यात आलेल्या पाचही नागरिकांना कडेकोट सुरक्षेत मुंबईत आणण्यात आलं आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्ष, एटीएस, सीमाशुल्क आणि इतर तपास यंत्रणांच्या संयुक्त पथकाद्वारे त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. भारताच्या कुठल्या भागात हे अंमली पदार्थ पोहचवले जाणार होते आणि या मागे आंतरराष्ट्रीय टोळी किंवा नेटवर्क कार्यरत आहे का? हेदेखील तपासण्यात येतं आहे असंही सांगण्यात आलं आहे.

ड्रग्ज तस्करीच्या आरोपात पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लक्षद्वीप जवळच्या सागरी हद्दीतून अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती भारतीय तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने हवाई आणि सागरी पाळत वाढवली होती. एक संशयित इराणी बोट सागरी हद्दीच्या दिशेने येत असल्याचं स्पष्ट होताच ही कारवाई करण्यात आली. बोट, बोटीचा चालक यांनाही अटक करण्यात आली आहे. विदेशी सिंडिकेटचा आर्थिक कणा मोडण्यात यश आल्याचं तटरक्षक दलाने आणि एटीएसने हे स्पष्ट केलं आहे.