केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या अॅप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अॅप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत. ईकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप अॅप स्टोअरनाही हे अॅप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्ले स्टोअरवर भारतात ५४ अॅप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. आतापर्यंत भारतात २५४ चिनी अॅप्सवर बंदी- जून २०२० पासून सरकारने सुमारे २२४ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. पहिल्यांदा जेव्हा चिनी अॅप्सवर बंदी घातली तेव्हा ५९ अॅप्सचा समावेश होता. ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. नंतर नोव्हेंबरमध्ये, स्नॅक व्हिडिओ, AliExpress आणि AliPay कॅशियरसह आणखी ४३ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सरकारने आणखी ११८ अॅप्सवर बंदी घातली. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची यादी खालीलप्रमाणे. 1 Beauty Camera: Sweet Selfie HD2 Beauty Camera – Selfie Camera3 Equalizer – Bass Booster & Volume EQ & Virtualizer4 Music Player- Music.Mp3 Player5 Equalizer & Bass Booster – Music Volume EQ6 Music Plus – MP3 Player7 Equalizer Pro – Volume Booster & Bass Booster8 Video Player Media All Format9 Music Player – Equalizer & MP310 Volume Booster – Loud Speaker & Sound Booster11 Music Player – MP3 Player12 CamCard for SalesForce Ent13 Isoland 2: Ashes of Time Lite14 Rise of Kingdoms: Lost CrusadeIS/APUS Security HD (Pad Version)16 Parallel Space Lite 32 Support17 Viva Video Editor – Snack Video Maker with Music18 Nice video baidu19 Tencent Xriver20 Onmyoji Chess21 Onmyoji Arena22 AppLock23 Dual Space Lite – Multiple Accounts & Clone App24 Dual Space Pro – Multiple Accounts & App Cloner25 DualSpace Lite – 32Bit Support26 Dual Space – 32Bit Support27 Dual Space – 64Bit Support28 Dual Space Pro – 32Bit Support29 Conquer Online – MMORPG Game30 Conquer Online Il31 Live Weather & Radar – Alerts32 Notes- Color Notepad, Notebook33 MP3 Cutter – Ringtone Maker & Audio Cutter34 Voice Recorder & Voice Changer35 Barcode Scanner – QR Code Scan36 Lica Cam – selfie camera app37 EVE Echoes38 Astracraft39 UU Game Booster-network solution for high ping40 Extraordinary Ones41 Badlanders42 Stick Fight: The Game Mobile43 Twilight Pioneers44 CuteU: Match With The World45 Small World-Enjoy groupchat and video chat46 CuteU Pro47 FancvU – Video Chat & Meetup48 Real: Go Live. Make Friends49 MoonChat: Enjoy Video Chats50 Real Lite -video to live!51 Wink: Connect Now52 FunChat Meet People Around You53 FancyU pro – Instant Meetup through Video chat!54 Garena Free Fire – Illuminate या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.