scorecardresearch

Premium

Indian Navy Day : भारत चार डिसेंबरला ‘नौदल दिन’ का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

जगातील नौदलांच्या इतिहासात चार डिसेंबर १९७१ चा भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला हल्ला ही एक धाडसी कारवाई मानली जाते.

indian navy day, navy day celebration, attack on karachi, missile attack, Operation Trident pakistan navy
Indian Navy Day : भारत चार डिसेंबरला 'नौदल दिन' का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

नौदलातील युद्धनौकांची संख्या आणि नौसैनिकांची संख्या लक्षात घेतली तर जगातील चौथ्या क्रमांकाचे नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख आहे. ३५ प्रमुख युद्धनौका आणि दोन अणुउर्जेवर कार्यरत असलेल्या पाणबुड्यांसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १५० विविध प्रकराच्या युद्धनौका कार्यरत आहेत. भारताच्या तिन्ही बाजूंना पसरलेला अथांग समुद्र, या भागातून तसंच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध ठिकाणी विशेषतः आखातांमधून सुरु असलेली जलवाहतूक, चीनचे वाढते वर्चस्व यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय नौदलाने कात टाकली आहे.

तीन हजार वर्षांपासून इतिहासतील विविध राजे-घराणे इथपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल ते पुढे सध्याचे आधुनिक नौदलाने असा भारतीय नौदलाचा दबदबा राहिला आहे. विशेषतः ४ डिसेंबर १९७१ या दिवशी नौदलाने दिलेल्या दणक्याने पाकिस्तानच्या नौदलाचे कंबरडे मोडले, भारतीय नौदलाचे नाणे जगात खणखणीत वाजले.

PM Narendra Modi Worlds best leader
अरे व्वा! पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वांत लोकप्रिय नेते, दुसऱ्या-तिसऱ्या स्थानांवर कोण?
man becomes a fake army officer for love and caught by senior officer
तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला अन्…
Amit Shah
भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षेसाठी केंद्राचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, १९७० सालचा ‘हा’ करार केला रद्द
18 accused get 7 year jail for attack on trustees in mosque
मशिदीत विश्वस्तांच्या वादातून प्राणघातक हल्ला; १८ आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी 

नौदलाची आगेकूच

१९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. तीन डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने पश्चिमेकडील भारताच्या हद्दीत वायू दलाच्या विविध तळांवर हल्ले केले आणि युद्धाला सुरुवात केली.

चार डिसेंबरच्या रात्री भारताच्या युद्धनौकांचा समूह पाकिस्तानच्या युद्दनौकांना, रडार यंत्रणांना चकवत कराची बंदरापासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर येऊन स्थिरावला. या समुहात तीन विद्युत वर्गातील क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका ( Vidyut-class missile boat – INS Nipat, INS Nirghat and INS Veer ), दोन कॉर्वेट (Corvette) प्रकारातील युद्धनौका (INS Kiltan and INS Katchall) आणि इंधनवाहू टँकर (INS Poshak ) यांचा समावेश होता.

युद्धनौकांचा निर्णायक हल्ला

रात्री हळूहळू नियोजित पद्धतीने युद्धनौकांनी कराचीकडे आगेकूच करायला सुरुवात केली. किनाऱ्यापासून ७० किलोमीचर अंतरावर INS Nirghat ने क्षेपणास्त्र डागत PNS Khaibar या पाकिस्तानच्या युद्धनौकेला जलसमाधी दिली. INS Nipat या युद्धनौकेने क्षेपणास्त्र हल्ला करत PNS Shah Jahan नावाच्या युद्धनौकेचे नुकसान केले आणि एका मालवाहू जहाजाला बुडवले. INS Veer ने क्षेपणास्त्र डागत PNS Muhafiz ही युद्धनौका बुडवली. INS Nipat पुढे आगेकूच करत कराची बंदराजवळ अवघ्या २६ किलोमीटर एवढ्या अंतरावर पोहचत क्षेपणास्त्र डागली, ज्यामध्ये बंदरातील इंधन साठ्याचे मोठे नुकसान झाले.

या संपूर्ण मोहिमेला Operation Trident असं नाव देण्यात आले होते. एवढंच नाही तर असा हल्ला केल्यावर पुन्हा चार दिवसांनी म्हणजेच आठ-नऊ डिसेंबरच्या रात्री Operation Python मोहिम राबवत भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांनी कराची बंदरावर पुन्हा हल्ला करत पाकिस्तानच्या एका इंधनावाहू युद्धनौकेचे नुकसान केले तर कराची बंदरातील आणखी एका इंथन साठा उद्ध्वस्त केला.

पाकिस्तान नौदल हादरले

या दणक्याने पाकिस्तान त्याचे नौदल हे पश्चिम भागातच म्हणजे कराची बंदराच्या आसपास ठेवू शकला, कराची बंदरात पाकिस्तानच्या युद्धनौकांना इंधनाची मोठी कमतरता जाणवली, त्यांना पुढे सरकता आले नाही. त्यामुळेच दुसरीकडे पूर्व पाकिस्तान ( आत्ताचे बांगलादेश ) च्या समुद्रात भारतीय नौदलाला पुर्णपणे वर्चस्व राखण्यास एकप्रकारे मदत झाली.

चार डिसेंबर १९७१ ला भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला हल्ला ही जगातील नौदलाच्या इतिहासात एक धाडसी कारवाई मानली जाते. १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामधील विजयातले ते एक सोनेरी पान आहे. यामुळेच १९७२ पासून ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian navy day why india celebrates navy day on december 4 what exactly happened on this day asj

First published on: 04-12-2023 at 07:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×