गोव्यात भारतीय नौदलाचे टेहळणी विमान कोसळले, दोन अधिकारी बेपत्ता

भारतीय नौदलाचे एक टेहळणी विमान मंगळवारी रात्री गोवा येथील समुद्रात कोसळले.

भारतीय नौदलाचे एक टेहळणी विमान मंगळवारी रात्री गोवा येथील समुद्रात कोसळले. रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दक्षिण-पश्चिम समुद्रकिनाऱ्यापासून २५ नॉर्टिकल मैलावर हे विमान कोसळल्याचे समजते. या दुर्घटनेत वैमानिकासह अन्य एक अधिकारी बेपत्ता झाला आहे. विमानातल्या अधिकाऱ्यांपैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अन्य दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. नौदलाच्या ताफ्यातील हे डॉर्नियर जातीचे विमान नेहमीप्रमाणे गस्तीसाठी निघाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian navy surveillance aircraft crashes in goa two officers on board missing

ताज्या बातम्या