भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नेत्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता आनंद यांना मंगळवारी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर आनंद यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष महिनाभरापूर्वी सरकारमध्ये आला आहे. दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहणाऱ्या ट्रूडो यांच्या पक्षाला मात्र बहुमत मिळू शकलेले नाही.

नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच ट्रूडो संरक्षणासह काही मंत्रालयांमध्ये फेरबदल करतील अशी शक्यता होती. दरम्यान, ५४ वर्षीय अनिता आनंद यांनी भारतीय वंशाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन यांची जागा घेतली आहे. कॅनडाच्या लष्करातील लैंगिक शोषणाची प्रकरणे योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल हरजित सज्जन यांच्यावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर त्यांच्याकडून संरक्षण मंत्रीपद काढून घेण्यात आलं असून त्यांना आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री करण्यात आलं आहे, असं वृत्त कॅनेडियन वृत्तपत्र नॅशनल पोस्टने दिलंय.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल

सज्जन यांची आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. ग्लोबल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ काही आठवड्यांपासून एका महिलेला संरक्षण मंत्री बनवण्यात यावं, असं सूचवत होते. जेणेकरून लष्करातील लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना चांगला संदेश जाईल. दरम्यान, वकील असलेल्या आनंद सेनेतील अशा घटनांबाबत कठोर पावले उचलू शकतात, असं म्हटलं जातंय.

अनिता आनंद यांचा भारताशी संबंध..

अनिता आनंद यांचे वडील तामिळनाडूचे तर आई पंजाबची होती. अनिता आनंद यांचा जन्म नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे झाला. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर होते. त्यांची आई सरोज डी. राम भूलतज्ज्ञ होत्या आणि वडील एस.व्ही. आनंद हे जनरल सर्जन होते.