ब्रिटनच्या दहशतवाद विरोधी मेट्रोलपोलिटन पोलिसांनी एका ३६ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेस अटक केली आहे. कुंतल पटेल असे या महिलेचे नाव असून ब्रिटनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू असलेल्या छाप्यांच्या दरम्यान अटक करण्यात आली आहे.
कुंतल पटेल या ब्रिटनमधील बार्कलेस बँकेच्या कर्मचारी आहेत. त्यांना पूर्व ब्रिटनमधून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. ब्रिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी, गुन्हा आणि सुरक्षा कायदा २००१ च्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून इतक्यात याबद्दल अधिक माहिती आम्हाला देता येणार नाही असेही ब्रिटन पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अटक करण्यात आलेल्या कुंतल पटेल यांची आई मिना पटेल ब्रिटनमधील एका सत्र न्यायालयाच्या दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कुंतल पटेल बँक कर्मचारी आहेत. या मायलेकींची आतापर्यंतची ब्रिटनमधील वागणूक सभ्य राहीलेली आहे. दोघींनाही कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी नसल्याची माहिती ‘द टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केली आहे.

Story img Loader