कॅनडातील टोरंटो शहरात भारतीय वंशाची तरुणी हिमांशी खुराणाची हत्या करण्यात आली. ही घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली होती. या प्रकरणात आठ महिन्यांनी तिचा पार्टनर अब्दुलला पोलिसांनी अटक केली आहे. हिमांशी खुराणाचं हत्या प्रकरणत चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणात आता पोलिसांनी तिचा लिव्ह इन पार्टनर अब्दुल गफुरीला अटक केली आहे, मागील आठ महिन्यांपासून तो फरार होता.

टोरांटो पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

टोरांटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशी खुराणा हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिमांशीचा लिव्ह इन पार्टनर अब्दुल गभुरीला ७ ऑगस्टला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात फर्स्ट डिग्री मर्डर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी आणि कॅनडामध्ये आणण्यासाठी Fugitive Sqad ची मदत घेतली होती. हिमांशी खुराणाची हत्या झाल्यापासून मागचे आठ महिने पोलीस त्याच्या मागावर होते अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. १९ डिसेंबर २०२५ ला हिमांशी खुराणा बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर २०२५ ला तिचा मृतदेह एका घरात आढळून आला होता.

हिमांशी आणि अब्दुल लिव्ह इन पार्टनर होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशी खुराणा आणि अब्दुल गफुरी हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते अशीही माहिती पोलिसांनी दिली. हिमांशीची हत्या केल्यानंतर अब्दुल गफुरी फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध फक्त टोरांटोमध्ये नाही तर संपूर्ण कॅनडामध्ये घेतला होता. अखेर आठ महिन्यांनी तो सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हिमांशी खुराणाचं हत्या प्रकरण काय?

हिमांशी खुराणा ही ३० वर्षीय भारतीय वंशाची तरुणी टोरंटो शहरातील स्ट्रॅचन अव्हेन्यू परिसरात वास्तव्यास होती. १९ डिसेंबर २०२५ ला ती अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली. ज्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ च्या सकाळी ६.३० सुमारास पोलिसांना हिमांशीचा मृतदेह एका घरात आढळून आला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तिची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा प्रकार ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ किंवा वैयक्तिक संबंधांतील वादातून घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिमांशीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा ३२ वर्षीय प्रियकर अब्दुल गफुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच अब्दुल गफुरीला आता पोलिसांनी अटक केली आहे.