New Indian Railways ticket cancellation and refund rules : जर तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या आणि परताव्याच्या (Refund) नियमात मोठी कपात केली आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, १ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी किमान ८ तास आधी तिकीट रद्द करणे अनिवार्य असेल, अन्यथा पूर्ण पैसे कापले जातील.

लांब पल्ल्याचा रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आपल्याला आधीच तिकिट काढावी लागते. अनेकदा एक दोन महिने आधीच आपण आपल्या नियोजित वेळेची तिकिट काढतो. पण कधीतरी दौरे रद्द होतात किंवा काही कारणांनी तिकिट रद्द करावे लागते. अशावेळी रद्द केलेल्या तिकिटांचा परतावाही आपल्याला मिळतो. याच परताव्याबाबत भारतीय रेल्वेने आज नियम बदलले आहेत.

नवीन नियमातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या

  • कन्फर्म तिकीट प्रवासाच्या ७२ तासांआधी रद्द केल्यास तुम्हाला शक्य असलेली जास्तीत जास्त रक्कम परत मिळेल.
  • ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांच्या आत म्हणजे तीन दिवसांच्या आत तिकिट द्द केल्यास मानक दंड आकरला जाईल. किमान शुल्काच्या २५ टक्के रक्कम कापली जाईल.
  • गाडी सुटण्याच्या २४ ते ८ तास आधी ट्रेनचे तिकिट रद्द केल्यास किमान शुल्काच्या आधीन राहून भाड्याच्या ५० टक्के रक्कम कापली जाणार आहे.
  • तर, ट्रेन सुटण्याच्या आठ तासांआधी तिकिट रद्द केले तर प्रवशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

जुन्या नियमांमध्ये काय बदलले आहे?

जुना निमय: ४ तासांच्या आत रद्द केल्यास परतावा मिळणार नाही.
नवा नियम: प्रवासाच्या ८ तासांच्या आत रद्द केल्यास परतावा मिळणार नाही.

जुना नियम: हा लाभ केवळ ४८ तासांपूर्वी रद्द केल्यासच उपलब्ध होता.
नवा नियम: ७२ तासांपूर्वी रद्द केल्यास (किरकोळ शुल्कासह) संपूर्ण रक्कम परत मिळेल.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याबाबतही नियम बदलले

प्रवाशांना आता बोर्डिंगमध्ये थोडी अधिक लवचिकता मिळाली आहे. तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.