IRCTC Baby Berth: तुम्ही लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR) झोनने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आणखी एक पाऊल उचलले आहे. उत्तर रेल्वे झोनच्या लखनौ विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये खालच्या बर्थमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या या निर्णयामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. बेबी बर्थमधील प्रवासी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलाला अतिरिक्त बर्थमध्ये बसवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बेबी बर्थ सोयीचा असेल. प्रवासादरम्यान बाळाला बेबी बर्थमध्ये ठेवून प्रवासी याचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच लहान मूल झोपताना खाली पडू नये यासाठी या बर्थमध्ये स्टॉपरही बसवण्यात आला आहे.

ही सीट फोल्ड करण्यायोग्य आहे, जो गरजेनुसार वापरता येतो आणि गरज नसताना दुमडता येतो. मात्र, ही सुविधा फक्त खालच्या बर्थमध्ये उपलब्ध असेल.

ट्विट करून दिली माहिती

लखनऊ डीआरएमने ट्विट केले की, मातांना त्यांच्या बाळासोबत प्रवास करता यावा यासाठी लखनऊ मेलमध्ये कोच क्रमांक १९४१२९/बी४, बर्थ क्रमांक १२ आणि ६० मध्ये बाळ बर्थ सुरू करण्यात आला आहे. फिट बेबी सीट फोल्ड करण्यायोग्य आहे आणि सुरक्षितही आहे.

टेस्टिंग सुरु

रेल्वेने चाचणीच्या उद्देशाने बेबी बर्थ फक्त एका डब्यात जोडला आहे. प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या प्रकारानुसार, रेल्वे इतर डब्यांमध्ये आणि इतर गाड्यांमध्येही ते बसवण्याचा निर्णय घेऊ शकते.

तुम्ही कसा फायदा घेऊ शकता?

बेबी बर्थसह सीट बुक करण्यासाठी रेल्वेकडून कोणतीही वेगळी प्रक्रिया आत्तापर्यंत ठेवण्यात आलेली नाही. सध्या ते फक्त चाचणीसाठी एका बोगीवर बसवण्यात आले आहे. यापुढील काळात रेल्वे जेव्हा जेव्हा याबाबत काही बदल करेल तेव्हा ते कळवेल. या बर्थबाबत चांगला आढावा घेतल्यास इतर बोगी आणि गाड्यांमध्येही तो बसवता येईल, अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways introduces foldable baby berth seat for women travelling with infants ttg
First published on: 10-05-2022 at 14:34 IST