भारतीय रेल्वेने प्रवासादरम्यान नेता येणाऱ्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना एकतर मर्यादित सामान ठेवावे लागेल, अन्यथा अतिरिक्त सामानासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी

नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना रेल्वेने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्त सामाना सोबत न्यायचे असल्यास त्यांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे. त्या संदर्भात रेल्वेने एक सुचक ट्वीट केले आहे.

हेही वाचा – राकेश झुनझुनवालांच्या २९ हजार ७०० कोटींच्या शेअर्सचं काय होणार?

”रेल्वे प्रवासादरम्यान जास्तीचे सामान घेऊन जाऊ नका. किंवा ते लगेज व्हॅनमध्ये बुक करा. जर सामान जास्त असेल, तर प्रवास अर्धवट राहील”, असे सूचक ट्वीट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

काय आहेत नवे नियम?

रेल्वेने प्रत्येक डब्यानुसार सामानाची मर्यादा निश्चित केली आहे. यानुसार ४० ते ७० किलो वजनाचे सामान ट्रेनच्या डब्यात ठेवता येणार आहे. तर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांना ४० किलो पर्यंतचे सामान सोबत नेता येणार आहे. तसेच एसी डब्यात प्रवास करणाऱ्यांना ५० ते ७० किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी आहे.