Reality of Job Market in Canada 2025 एका भारतीय तरुणीने कॅनडातलं नोकऱ्यांचं वास्तव काय आहे ते एका व्हिडीओद्वारे दाखवून दिलं आहे. ही तरुणी भारतीय असली तरीही कॅनडातच वास्तव्य करते. तिने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. कॅनडातल्या रोजगार मेळाव्यात अलोट गर्दी झाल्याचं ही महिला म्हणते आहे. ती म्हणते या ठिकाणी फक्त पाच नोकऱ्या आहेत पण परिस्थिती कशी आहे बघा.

या तरुणीने व्हिडीओमध्ये काय म्हटलं आहे?

कॅनडामध्ये भरपूर नोकऱ्या आहेत, आम्ही खोटं बोलतो आहे, सगळे पैसे आम्हालाच कमवायचे आहेत असं ज्या आमच्या नातेवाईकांना आणि ज्या लोकांना वाटतं आहे त्यांनी हा व्हिडीओ मी नक्की दाखवू इच्छिते. बघा या ठिकाणी जॉब फेअर आहे. पाच जागांसाठी ही रांग आहे. जिथवर तुमची नजर जाते आहे तिथपर्यंत लोक रांगेत उभे आहेत असं बघायला मिळतं आहे. असंही नाही की ही काहीतरी मोठ्या पदासाठीची नोकरी आहे. इंटर्न म्हणून काम करायचं आहे तरीही किती गर्दी झाली आहे तुम्हीच बघा. गुगल, अॅपलसारख्या कंपनीसारखीही ही नोकरी नाही. कॅनडाचं हे वास्तव आहे. हे मान्य असेल तरच भारत सोडून कॅनडाला या. नाहीतर भारतात जे काही चाललं आहे ते बरं चाललं आहे. तुम्हीच बघा एका छोट्याश्या नोकरीसाठी सकाळपासून रांग लावून लोक उभे आहेत. पाच ते सहा जागांसाठी ही भली मोठी रांग आहे तुम्हीच नीट बघा. असं या मुलीने म्हटलं आहे. कौंतेया असं या मुलीचं नाव आहे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवटर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौंतेयाच्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया

कौंतेया नावाच्या मुलीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ कॅनडात नोकऱ्यांची काय अवस्था आहे ते दाखवतो आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. कॅनडाच नाही तर टोरांटोमध्येही अशीच परिस्थिती आहे. छोट्याश्या नोकरीसाठी जेव्हा मुलाखत घेतली जाते तेव्हा लांबच लांब रांगा दिसतात. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी आहेत असं लोकांना वाटतं वस्तुस्थिती वेगळी आहे. तर काहींनी अशाही कमेंट केल्या आहेत कॅनडात नोकरीच्या संधी आहेत त्या मिळवायच्या कशा हे तुम्हाला माहीत हवं. तुमच्याकडे काम करण्याचं योग्य कौशल्य आणि शिक्षण असेल तर व्हॅनकोअरमध्येही नोकरीच्या संधी आहेत. मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, टेलस, फोर्टिसबीसी या सगळ्या संस्थांमध्ये नोकरीच्या संधी आहेत तुम्हाला त्या शोधता आल्या पाहिजेत असंही एका युजरने म्हटलं आहे.