Women’s Hockey : सुवर्णपदक आणा आणि घर/गाडीच्या मालकीण व्हा; हिरे व्यापाऱ्यानं महिला हॉकी संघासाठी केली ‘गोल्डन’ घोषणा

प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी गोल्डन घोषणा केली आहे. उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर ढोलकिया यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे.

Savji Dholakia, Tokyo Olympic, Gold Medal, Women Hockey team, Final, Tokyo olympic, Diamond King, Gujarat Diamond King
महिला हॉकी संघाचं मनोबल उंचावण्यासाठी प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी गोल्डन घोषणा केली आहे. उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर ढोलकिया यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे.

यंदाची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात फारशी पदकं जमा झाली नसली, तर अनेक ऐतिहासिक क्षण भारतीयांना अनुभवायला मिळाले आहेत. यापैकीच एक म्हणजे भारतीय महिला हॉकी संघाने घडवलेला इतिहास. टोक्यो ऑलिम्पिकची प्रथमच उपांत्य फेरी गाठून भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याकडे भारतीयांच्या नजरा असून, महिला हॉकी संघाचं मनोबल उंचावण्यासाठी प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी गोल्डन घोषणा केली आहे. उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर ढोलकिया यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय महिला संघाचा आज अर्जेंटिनासोबत सामना होणार आहे. अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे ‘सुवर्णलक्ष्य’ गाठण्याचं आव्हान महिला संघापुढे आहे. या उपांत्य फेरीतील सामन्याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या असून, महिला हॉकी संघाचं मनोबल उंचावण्यासाठी हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी मोठी घोषणा केली आहे.

सावजी ढोलकिया यांनी एक ट्वीट केलं आहे. “मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, महिला हॉकी संघाने अंतिम सामना जिंकला, तर हॉकी संघातील महिला खेळाडूंना हरि कृष्णा ग्रुपच्या वतीने ११ लाख रुपयांचं घर किंवा नवीन कार भेट दिली जाईल. आपल्या मुली टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक पावलांवर इतिहास रचत आहेत, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे”, असं ढोलकिया यांनी म्हटलं आहे.

याच ट्वीटमध्ये ढोलकिया पुढे म्हणतात,”ज्या खेळाडूंकडे गाडी नाही, त्यांना ५ लाख रुपये गाडीसाठी दिले जातील. ज्यांच्याकडे घरं नाही त्यांना ११ लाख रुपये घरासाठी मदत देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचं मनोबल वाढण्याबरोबरच निश्चय दृढ व्हावा हेच आमचं लक्ष्य आहे. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, हेच १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला हॉकी संघाला सांगायचं. आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढावा आणि त्यांनी देशाची मान उंचवावी म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे”, असं सावजी ढोलकिया यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian women hockey win olympic final get house or a car gujarat diamond baron savji dholakia big announcement for team members bmh

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना