आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका अखेर भारताच्या नौदल हद्दीत दाखल झाली आहे. लवकरच तिचा नौदलाच्या पश्चिम विभागात समावेश करण्यात येईल. या युद्धनौकेच्या आगमनानंतर, आता आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या दोन युद्धनौका पश्चिम विभागात एकत्र काम करतील.
ही युद्धनौका भारताने रशियाकडून घेतली असून, रशिया व भारत या दोन्ही देशांच्या लढाऊ जहाजांनी तिला प्रवासात संरक्षण दिले होते. या युद्धनौकेला हवाई हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी वादग्रस्त बराक क्षेपणास्त्रांची निवड केली होती. आता ही नौको पूर्णपणे स्थिरस्थावर झाल्यानंतरच त्यावर बराक क्षेपणास्त्रे बसविण्यात येतील. आठ हजार नाविक मैल इतका अखंड प्रवास करून ही युद्धनौका भारतात आली आहे.