scorecardresearch

COVID19 : देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या २ लाखांच्या खाली आली ; मृतांच्या संख्येत मात्र वाढ!

मागील २४ तासांत देशभरात २ लाख ५४ हजार ७६ रूग्ण कोरनातून बरे देखील झाले आहेत

(प्रातिनिधिक छायाचित्र)

देशातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत आहे. ही बाब जरी काहीशी दिलासादायक असली, तरी दुसऱ्या बाजुला करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात आढललेल्या करोनाबाधितांची संख्यी ही दोन लाखांच्या खाली दिसून आली. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्या ही एक हजारांचीही पुढे आहे.

देशभरात मागील २४ तासांत १ लाख ६७ हजार ०५९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १ हजार १९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याशिवाय देशभरात याच कालावधीत २ लाख ५४ हजार ७६ रूग्ण कोरनातून बरे देखील झाले आहेत. अॅक्टीव्ह केसेसची संख्या १७, ४३,०५९ (४.२० टक्के) आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ११.६९ टक्के आहे. देशभरात १,६६,६८,४८,२०४ जणांचे लसीकरण झालेले आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या इंट्रानेझल (नाकाद्वारे लस) करोना लशीच्या वर्धक मात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस भारताच्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा भाग होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indias daily cases drop below 2 lakh msr