भारतात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नव्या बाधितांची नोंद झाली तर मृतांचा आकडा आजही ४०००च्या पार गेला आहे. आज देशातल्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत एक लाखाची घट झाली आहे. त्यामुळे देशातल्या एकूण बाधितांची संख्या आता ३० लाख २७ हजार ९२५वर पोहोचली आहे.

देशात करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या तमिळनाडू राज्यात नोंदवण्यात आली. गेल्या २४ तासात तमिळनाडूमध्ये ३५हजार ५७९ नव्या बाधितांची नोंद झाली. तर त्याखालोखाल म्हणजे ३० हजार ४९१ नवे बाधित केरळमध्ये आढळून आले. या रांगेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २९ हजार ९११ नव्या बाधितांची नोंद झाली तर कर्नाटकात २८हजार ८६९ नवे बाधित आढळले. आंध्रप्रदेशातला गेल्या २४ तासातला बाधितांचा आकडा २२ हजार ६१० वर पोहोचला आहे. देशातल्या एकूण दैनंदिन बाधितांपैकी ५६.८१ टक्के बाधित हे या पाच राज्यांमधले आहेत. तर एकट्या तमिळनाडूमधली रुग्णसंख्या देशातल्या रुग्णसंख्येच्या १३.७१ टक्के आहे.

मृत्युची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या २४ तासात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात ९८४ मृत्यू केवळ एका दिवसात नोंदवण्यात आले. तर त्या खालोखाल कर्नाटकात ५४८ मृत्युंची नोंद झाली. तर दिल्लीतला करोनाची लागण होण्याचा दर पाच टक्क्यांच्या आसपास आहे तर मुंबईतला करोनाची लागण होण्याचा दर १० टक्क्यांच्या खाली आला आहे.