scorecardresearch

नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध; किती आहे किंमत?

करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं आहे.

Indias first Nasal Vaccine
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

करोनाविरोधातील लढ्यात भारताला आणखी एक यश मिळालं असून नाकावाटे दिली जाणारी करोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. इन्कोव्हॅक (Incovacc) असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते आज वितरण करण्यात आलं.

हेही वाचा – ‘गायीतून धर्माचा जन्म झाला, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील’; श्लोकांचा दाखला देत गुजरातमधील न्यायालयाचा निष्कर्ष

इन्कोव्हॅकला २०२२ मध्ये मिळाली मान्यता

इन्कोव्हॅक या लसीसाठी भारत बायोटेकला डिसेंबर २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती. ही लस वर्धक मात्रा म्हणून देखील देता येणार आहे. यापूर्वी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड या लसींची मात्रा घेणारे सुद्धा वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅकचा वापर करू शकतात. तसेच १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना ही लस घेता येणार आहे.

किती असेल किंमत?

भारत बायोटेकने विकसित केलेल्या या लसीची किंमत सरकारी रुग्णालयात प्रति मात्रा ३२५ रुपये, तर खाजगी रुग्णालयांत प्रति मात्रा ८०० रुपये असणार आहे. तसेच या लसीच्या नोंदणीसाठी कोविन ॲपवर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 17:05 IST
ताज्या बातम्या