भारताच्या महत्वाकांक्षी मंगळ मोहिमेमध्ये आज सोमवार पहिला अडथळा आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘मार्स ऑरबायटर’ या अवकाशयानाला आपली कक्षा आणखी एक लाख किमीने वाढविण्यात अपयश आले आहे. तरीसुद्धा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) निराश न होता उपग्रह उत्तम स्थितीत असून त्याची कक्षा वाढविण्याचा प्रयत्न उद्या सकाळी पुन्हा एकदा केला जाणार असल्याचे सांगितले आहे.
मंगळ मोहिमेला पुण्याचाही हातभार!
भारताच्या मंगळ मोहिमेच्या सध्याच्या स्थितीनुसार हे यान पृथ्वीभोवतीच फिरत आहे. आवश्यक असलेला वेग प्राप्त झाल्यानंतर मंगळ मोहिमेची खरी सुरुवात होईल अशी माहिती सुत्रांनी दिली.
भेदाभेद ‘अमंगळ’!
तब्बल पंधरामहिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ५ नोव्हेंबर दिपावलीच्या मंगलमय वातावरणात इस्रोच्या पीएसएलव्ही सी२५ने मंगळवारी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी ‘मंगलयाना’सह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात उड्डाण केले होते. या मोहिमेमुळे आपल्या पहिल्यावहिल्या आंतरग्रह मोहिमेमार्फत भारत अशी कामगिरी करणाऱ्या जगातील अत्यंत मोजक्या देशांच्या यादीत स्थानापन्न झाला.
सुमंगळ