विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइन्सने एक ऑफर आणली आहे. इंडिगोने 10 लाख विमान तिकिटांच्या विक्रीसाठी सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये तिकिटाची किंमत अवघ्या 999 रुपयांपासून सुरू होत आहे.
देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत 999 रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत 3199 रुपयांपासून सुरू होत आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असेल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
999 रुपयांपासून तिकिटांची किंमत सुरू होत असून ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करु शकतात, असं कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले. इंडिगोच्या या सेलला तीन सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी हा सेल आहे. या व्यतिरिक्त मोबिक्विक या अॅपद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅकही मिळेल. कॅशबॅक जास्तीतजास्त 600 रुपयांपर्यंतच मिळेल.
