IndiGo CEO pieter elbers on when will operations return to full normal situation : इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनी आहे. मात्र, सध्या इंडिगोला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे किंवा त्यांना विलंब झाला आहे. यामुळे देशभरातील विमानतळावर हजारो प्रवासी अडकून पडल्याचा प्रकार घडला. यानंतर आता इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी जाहीर माफी मागितली आहे. तसेच त्यांनी कंपनीच्या विमान सेवेला आज (५ डिसेंबर) सर्वाधिक फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. दररोजच्या एकूण विमान उड्डाणांच्या अर्ध्याहून अधिक, म्हणजेच एक हजारहून जास्त विमान उड्डाणे आज रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
त्यांनी एका सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांची माफी मागितली आहे. तसेच विमान कंपनीकडून केल्या जात असलेल्या उपायांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
पीटर एल्बर्स काय म्हणाले?
मी इंडिगोचा सीईओ पीटर एल्बर्स आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की आम्हाला गेल्या काही दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तेव्हापासून संकट वाढत चालले आहे आणि आज, ५ डिसेंबर हा दिवस सर्वाधिक परिणाम झालेला दिवस होता, आज रद्द झालेल्या विमानांची संख्या एक हजारांहून जास्त किंवा आमच्या दररोजच्या उड्डाणांच्या अर्ध्याहून अधिक होती, असे पीटर एल्बर्स म्हणाले.
“विमाने रद्द होणे किंवा विलंब यामुळे आमच्या ग्राहकांना झालेल्या प्रचंड गैरसोयीबद्दल, मी इंडिगोमधील आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून माफी मागू इच्छितो. ही परिस्थिती विविध कारणामुळे तयार झाली आहे, पण तरीही तुमच्यासाठी एक ग्राहक म्हणून हे महत्त्वाचे आहे की, आम्ही इंडिगो म्हणून, ती कशी हाताळतो, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे कंपनीकडून केले जात असलेले उपायांबद्दल माहिती दिली, त्यांनी सांगितले की –
आम्ही तीन मार्गांनी काम करत आहोत:
-सर्वप्रथम कस्टमर कम्युनिकेशन आणि त्यांच्या गरजांची दखल, यासाठी सोशल मीडियावर संदेश पाठवण्यात आला आहे आणि आत्ताच रिफंड, कॅन्सलेशन आणि इतर कस्टमर सपोर्ट याबद्दल माहिती देणारा सविस्तर संदेश पाठवण्यात आला आहे. तसेच आम्ही कॉल सेंटरची क्षमता वाढवली आहे.
-दुसरे, कालच्या परिस्थितीमुळे ग्राहक मुख्यतः देशातील सर्वात मोठ्या विमानतळांवर अडकले होते. आमचे लक्ष्य हे त्यांनी आज प्रवास आज पूर्ण व्हावा असे होते, जे साध्य केले जाईल. यासाठी आम्ही ज्यांची विमाने रद्द झाली आहेत अशा ग्राहकांनी विमानतळावर येऊ नये असे नोटिफिकेशन्स पाठवले आहेत.
-तिसरे म्हणजे, उद्या सकाळपासून नव्याने सुरूवात करण्यासाठी, आमचा क्रू आणि विमानांनी गरज असलेल्या ठिकाणी राहवे, यासाठी आज विमाने रद्द करण्यात आली.
दुर्दैवाने, काही दिवसांत करण्यात आलेले उपाय हे पुरेसे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही आज आमच्या सर्व प्रणाली आणि शेड्यूल्स रिबूट करण्याचा निर्णय घेतला, यामुळे आजवरची सर्वाधिक विमाने रद्द करण्यात आली, पण उद्यापासून हळूहळू सुधारणा होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे, असेही सीईओ म्हणाले.
या कारवाईमुळे आम्हाला अपेक्षा आहे की, उद्या रद्द होणाऱ्या विमानांची संख्या १००० पेक्षा कमी असेल. विशेषतः एफडीटीएल (FDTL) निर्देशांच्या अंमलबजावणीमध्ये डीजीसीएने दिलेला दिलासा खूपच मदतीचा ठरला आहे, असेही पीटर एल्बर्स म्हणाले.
अजून खूप मोठी प्रगती करणे बाकी आहे, पण येथून पुढे नागरी उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीए बरोबर मिळून आम्ही दररोज सुधारणा होण्याची अपेक्षा बाळगत आहोत. आमच्या ऑपरेशन्सचा आकार, स्केल आणि गुंतागुंत पाहता, पूर्णपणे सामान्य स्थितीत परत येण्यासाठी थोडा वेळ लागेल, जो आम्हाला १० ते १५ डिसेंबरदरम्यान अपेक्षित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
मला समजू शकतो की, या अडचणींमुळे आमच्या अनेक ग्राहकांची खूप गैरसोय झाली आहे आणि गेल्या १९ वर्षात काळजीपूर्वक निर्माण केलेल्या इंडिगोच्या विश्वासार्हतेवरील त्यांचा भरवसा डळमळीत झाला आहे. माझे सहकारी आणि इंडिगोची सर्व टीम आणि फ्रंटलाइन स्टाफ परिस्थितीचा सामना करण्यासाठी अथक मेहनत करत आहेत.
तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही फक्त तुमची निष्ठा आणि विश्वास परत मिळवण्यासाठीच नाही, तर येत्या काळात तो आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या हातात असलेले सर्व काही केले जात आहे.
या कठीण काळात तुम्ही दाखवलेला संयम, समजूतदारपणा आणि दयाळूपणा याबद्दल आपले आभारी आहोत. आम्ही वेळोवेळी तुम्हाला माहिती देत राहू, असेही इंडिगोचे सीईओ त्यांच्या निवेदनात म्हणाले आहेत.
