“ इंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते हे माहीत होतं, पण तरीही… ” ; प्रियंका गांधींचं मोठं विधान!

जाहीर सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी सांगितलं की इंदिरा गांधी ‘ त्या’ दिवशी राहुल गांधींना काय म्हणाल्या होत्या.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज(रविवार) उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे सभेत बोलताना भाजपावर जोरदार निशाणा साधला. याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याच्याबाबत बोलताना खळबळजनक विधानही केलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, “त्यांना(माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) माहीत होतं की त्यांची हत्या होणार होती. आजच्याच दिवशी जेव्हा माझा भाऊ आणि मी शाळेत जात होतो, रोज शाळेत जाण्या अगोदर आम्ही आमच्या आजीला भेटत होतो. आजच्याच दिवशी त्यांनी माझ्या भावाला सांगितलं होतं की, बेटा जर मला काही झालं तर रडायचं नाही. त्यांना माहिती होतं की त्यांची हत्या होऊ शकते, पण तरीही त्या कधीच मागे हटल्या नाही. त्यांच्याठी तुमच्या विश्वासापेक्षा जास्त या देशात, या जगात काहीच नव्हतं. तुमचा विश्वास होता आणि त्यांच्या हृदयात आपल्या देशाबद्दल विश्वास होता. आज जर मी तुमच्यासमोर उभी आहे, तर ही त्यांचीच शिकवण आहे. मी देखील तुमचा विश्वास कधीच तोडू शकत नाही.”

तसेच, यावेळी प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील निशाणा साधला. त्या म्हणाल्या “ दलित, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्यासह ब्राह्मण आदी सर्व वर्गांचे शोषण करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथ यांच्या शिकवणीच्या विरुद्ध सरकार चालवत आहेत. हे सरकार दररोज लोकांवर हल्ले करत आहे. ”

याचबरोबर “लखीपूर खेरी येथे ज्या प्रकारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या व्यथा कुणीच नाही ऐकल्या, हे या सरकारची वास्तविकता दर्शवते. हे दाखवते की या देशात शेतकऱ्यांची व्यथा कोणीच ऐकायला तयार नाही.” असंही यावेळी प्रियंका गांधींनी बोलून दाखवलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indira gandhi knew that she could be murdered priyanka gandhi msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या