जगभरात आज (२१ जून) पाचवा योग दिवसा साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून आधिकारी, सेलिब्रिटी, विद्यार्थी आणि जवानांनी योग करत आजचा दिवस साजरा केला. इंडो-तिबेटीयन बॉर्डर आणि बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) च्या जवानांनी उणे डिग्री तापमानात योगाभ्यस केला.

हिमालयात उत्तुंग शिखरांवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनीही योग करत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. त्याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये सिमेवर तैनात असलेल्या बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF)च्या जवानांनी योग दिवस साजरा केला. आयटीबीपीच्या सवनांनी लेह तसेच नक्शली छत्तीसगडमधील भागातही योग केले.

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी लेह लदाखमध्ये १८ हजार फूट उंचीवर उणे २० डिग्री तापमान योगासनं केली.