उत्तर अमेरिकेत ५ जी इंटरनेट लागू करण्यात आल्याने विमानांच्या संचालनात (नेव्हिगेशन) अडथळा येऊ शकतो म्हणून एअर इंडियाने भारत- अमेरिका मार्गावरील १४ विमानोड्डाणे बुधवारपासून रद्द केली. अमेरिकेत ५ जी इंटरनेटमुळे उद्भवलेल्या परिस्थतीवर मात करण्यासाठी भारतातील हवाई वाहतूक नियामक आपल्या विमान कंपन्यांशी समन्वयाने काम करीत आहे, असे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी पीटीआयला सांगितले.