इंडोनेशियाच्या बॅन्टेन येथील तुरुंगात आग लागून किमान ४० कैद्यांचा मृत्यू झाला आहे. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी याची या घटनेची माहिती दिली आहे. मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान ही आग लागली. अधिकारी अजूनही कारागृहातील कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मध्यरात्री १ किंवा २ च्या सुमारास आग लागली. यावेळी बहुतेक कैदी झोपले होते. या अपघातात अनेक कैदी गंभीर भाजले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेंगरंग कारागृहाचा ताबा घेण्यासाठी शेकडो पोलिस आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तुरुंगात १,२२५ कैद्यांची क्षमता असताना २००० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जेव्हा आग लागली तेव्हा ब्लॉक सी १२२ कैदी होते. काही तासांनंतर आग विझवली गेली आहे आणि सर्व पीडितांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

इंडोनेशियात तुरुंगातून पळून जाण्याची आणि दंगली होण्याचा घटना नेहमी घडत असतात. या तुरुंगात मोठ्या संख्येने बेकायदेशीर ड्रग्जच्या विरोधात अटक झालेल्या कैद्याना ठेवण्यात आलं आहे.