scorecardresearch

‘क्लायमेट चेंज’चा सर्वात मोठा फटका; ‘या’ देशाने घेतला राजधानीचं शहरच बदलण्याचा निर्णय, कारण…

वातावरणीय बदलांमुळे सध्याची राजधानी सोडून या देशाने नवीन राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला आहे

Indonesia new capital nusantara instead of Jakarta
(फोटो सौजन्य -AP)

इंडोनेशियाच्या संसदेने देशाची नवी राजधानी बनवणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली आहे. वातावरणीय बदलांमुळे सध्याची राजधानी जकार्ता बुडण्याचा धोका वाढला आहे तसेच ते मोठ्या प्रमाणात  प्रदूषित झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी वारंवार पूर येत असून शहर जलमय होते. याचा परिणाम सरकारच्या कामकाजावरही होतो. त्यानंतर नॅशनल कॅपिटल बिल मंगळवारी मंजूर करण्यात आले. याअंतर्गत इंडोनिशायाची आता नुसंतारा ही नवी राजधानी असणार आहे. नुसंतारा बोर्निओ बेटाचा भाग असलेल्या पूर्व कालीमंतनमध्ये आहे.

नवीन राजधानी तयार करण्यासाठी सुमारे ३२ अब्ज डॉलर खर्च केले जातील याचे वर्णन विधेयकात म्हटले आहे. नवी राजधानी ही देशाची ओळख असेल, असे पंतप्रधान सुहर्सो मोनोर्फा यांनी सांगितले. नवीन राजधानीचा मुख्य उद्देश हा ती देशाची ओळख बनणार असून ते आर्थिक वाढीचे केंद्रही बनेल. सध्याची राजधानी जकार्ता हे अतिशय दाट लोकवस्तीचे शहर बनले आहे. त्यामुळे तेथील मूलभूत सुविधांवर कमालीचा भार पडत आहे.

इंडोनिशाची राजधानी समुद्राजवळ असल्याने पुरात बुडण्याचा धोका नेहमीच होता. वातावरणातील बदलांमुळे हा धोका वाढत गेला आहे. या देशाचे एका अहवालात, जगातील सर्वात वेगाने बुडणारा देश असे देखील वर्णन केले आहे. त्यामुळे इंडोनेशियाने नवीन राजधारी वसवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन राजधानी जावा नावाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या बेटावर असेल. त्याचे नाव बोर्नियो आहे, जे आशियातील सर्वात मोठे बेट आहे. त्याचे वेगवेगळे भाग मलेशिया, ब्रुनेई आणि इंडोनेशियाच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाची नवी राजधानी ‘नुसंतारा’ हिचे हिंदू धर्माशी शतकानुशतके जुने नाते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indonesia new capital nusantara instead of jakarta abn

ताज्या बातम्या