LPG Gas Connection Price Hike : जर तुम्हीही नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला ७५० रुपये अधिक म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागतील.

पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी १५० रुपयांऐवजी २५० रुपये खर्च करावे लागतील.

Volkswagen India has launched the Taigun GT Line and Taigun GT Plus Sport konw features and prices
कुटुंबाला साजेशी SUV पण लूक एकदम Sporty! Volkswagen च्या ‘या’ गाड्यांची किंमत व फीचर्स एकदा पाहाच
Girls fight Video
तुफान राडा! भर रस्त्यात मुलींची दे दणादण हाणामारी; लाथा-बुक्क्यांनी मारलं, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल
lok sabha elections 2024 what are vvpats, how does an electronic voting machine evm works
ईव्हीएम मशीन कशी काम करते? त्यातून मतदान कसे होते? अधिकाऱ्यांनी Video तून दिली माहिती
Conductor issues 444 Rupees ticket for parrots travelling from bus leaving internet in a mix of shock and laughter
प्रवासात पोपटांना घेऊन जाणं पडलं महागात, बस कंडक्टरने दिलं ४४४ रुपयांचे तिकीट, मजेशीर पोस्ट व्हायरल

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, ५ किलोच्या सिलेंडरची सुरक्षा रक्कम आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम जमा करावी लागेल. दरम्यान, नवीन गॅस कनेक्शनसह येणाऱ्या पासबुकसाठी ग्राहकांना २५ रुपये आणि पाईपसाठी १५० रुपये मोजावे लागतील. नवीन कनेक्शनची किंमत सहसा अशा सर्व खर्चाचा समावेश करते. मात्र, गॅस सिलिंडरसह स्टोव्ह घेण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

कोणत्या वस्तूसाठी किती रुपये मोजावे लागणार

  • विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत – रु. १०६५
  • सिलेंडरसाठी सुरक्षा रक्कम – रु. २२००
  • रेग्युलेटरसाठी सुरक्षा रक्कम – रु. २५०
  • पासबुकसाठी २५ रुपये
  • पाईपसाठी १५० रुपये

आता तुम्ही एका सिलिंडरसह नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी गेलात, तर त्यासाठी तुम्हाला ३६९० रुपये मोजावे लागतील. स्टोव्ह घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. अशाप्रकारे, एलपीजीच्या वाढत्या किमतींनंतर आता कनेक्शनच्या वाढत्या किमतीमुळे लोक हैराण झाले आहेत.