सायबर क्राईम आणि हॅकिंग या गोष्टींवरून सातत्याने केंद्र सरकार आणि राज्यांमधील सरकार, सायबर सेल हे सामान्य नागरिकांना सतर्क करत असतात. वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सशी युजर्सच्या खात्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू असतात. या साईट्स सुरक्षेचे मोठमोठे दावे देखील करत असतात. पण बुधवारी सकाळी हे सगळे दावे फोल ठरल्याचं समोर आलं. कारण खुद्द केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचंच ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॅकरनं या खात्याचं नाव देखील बदललं आणि त्यावरून काही काळ हा पठ्ठ्या ट्वीट्स देखील करत होता! हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्यात आलं आहे.

I & B Ministry नाही, तर Elon Musk!

आज सकाळी हॅकरनं हे खातं हॅक केलं. या खात्याचं नाव एलॉन मस्क असं ठेवून त्यावर वेगवेगळे ट्वीट देखील त्यानं केल्याचं समोर आलं आहे. या ट्वीट्समध्ये ‘ग्रेट जॉब’ असं लिहून तो लागोपाठ ट्वीट करू लागला होता. सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयाने हे खातं पुन्हा रिकव्हर केलं. हॅकरने केलेले ट्वीट्स डिलीट करण्यात आले. तसेच, प्रोफाईल फोटो देखील पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर रीतसर ट्वीट करून सर्वांना ही माहिती देण्यात आली आहे.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Surrogate Mother Case, First in nagpur, Approved, Surrogacy Act 2021, District Medical Board,
नवीन कायद्यानुसार नागपुरात पहिल्या ‘सरोगेट मदर’ प्रकरणास मंजुरी
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
pune, Dandekar Bridge, Bindumadhav Thackeray, Construction, Grade Separator, Flyover,
पुणे : दांडेकर पूल, बिंदू माधव ठाकरे चौकात होणार ग्रेड सेपरेटर – उड्डाणपूल

“माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आलं आहे. फॉलोअर्ससाठी ही माहिती देण्यात येत आहे”, असं मंत्रालयानं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी हे ट्वीट करण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं?

साधारण सकाळी अर्ध्या तासासाठी तरी किमान हे अकाउंट हॅक झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हॅकरनं खात्याचं नाव बदलण्यासोबतच एलॉन मस्क यांचा फोटो देखील प्रोफाईलला लावला होता. तसेच “Love you guys! My gift here” असा संदेश पोस्ट करत त्यानं एलॉन मस्क यांच्या नावाने ट्वीट करत असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला होता.

हा ‘तो’च हॅकर?

दरम्यान, १२ डिसेंबर २०२१ रोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. तेही थोड्याच वेळात पुन्हा रिकव्हर करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत या अकाऊंटवरून क्रिप्टोकरन्सीसंदर्भातले काही ट्वीट्स पोस्ट करण्यात आले होते.

मात्र, ३ जानेवारी रोजी झालेल्या हॅकिंगमध्ये आणि आज झालेल्या हॅकिंगमध्ये साधर्म्य असल्याचा प्रशासनाला संशय आहे. ३ जानेवारी रोजी इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मान देशी महिला बँक हे तीन ट्विटर अकाउंट्स हॅक करण्यात आले होते. त्यावेळी देखील एलॉन मस्क असंच नाव बदलण्यात आलं होतं. या ट्वीट्सच्या फॉण्टदेखील समान असून ‘AMAZZZING’ हा संदेश देखील सारखाच असल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.