Infosys Techie इन्फोसिसमधल्या इंजिनिअरने स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा गुपचूप व्हिडीओ शूट केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. नागेश स्वप्नील माळी असं या इंजिनिअरचं नाव आहे. तो इन्फोसिसमध्ये सिनियर असोसिएट म्हणून काम करतो. या प्रकरणी त्याला व्हिडीओ चित्रण करताना रंगेहात पकडण्यात आलं. बंगळुरु या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?

FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला हा संशय होता की नागेश तिचे व्हिडीओ काढतो आहे. तिने नागेश व्हिडीओ चित्रण करत असतानाच त्याला पकडलं. ज्यानंतर तिने तातडीने या विरोधात आवाज उठवलं. बाकीचे कर्मचारी तिथे आले, त्यांनी नागेशला पकडलं आणि त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात या महिलेचे व्हिडीओ होते. या सगळ्या प्रकारानंतर एचआरकडून हे व्हिडीओ डिलिट करण्यात आले.

नागेश माळी असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागेशने फक्त या महिलेचंच नाही तर इतर महिला कर्मचाऱ्यांचंही गुप्तपणे शूटिंग केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्याची चौकशी पोलीस करत आहेत. नागेशचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. डिलिट केलेले व्हिडीओ पुनर्प्राप्त करण्यासाठी फॉरेन्सिक टीम काम करते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिल महिन्यात अयोध्येतही अशीच घटना

एप्रिल महिन्यात अयोध्येतही अशीच एक घटना घडली. या घटनेत राम मंदिराच्या जवळ असलेल्या गेस्ट हाऊसच्या एका कर्मचाऱ्याने एका महिलेचं व्हिडीओ चित्रण केलं होतं. ही महिला अंघोळीला गेली असताना त्याने हे चित्रण केलं होतं. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ही महिला राम मंदिरात रामाचं दर्शन घेण्यासाठी वाराणसीहून आली होती. तिने अंघोळ करत असताना सावली पाहिली आणि कुणीतरी आपलं चित्रण करतं आहे असा तिला संशय आला ज्यानंतर ही घटना उघडकीस आली. या गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली. सौरभ तिवारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव होतं. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सापडले. अशी माहिती पोलिसांनी दिली. आता अशाच प्रकारची घटना बंगळुरुमध्ये घडली आहे.