नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवरून विधानसभेत भाजपाला फटकारले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चित्रपट करमुक्त करण्याऐवजी यूट्यूबवर अपलोड करण्याचा सल्ला दिला होता. यावरुन केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर नाराजीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता केजरीवाल डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहेत आणि एका टीव्ही मुलाखतीत त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. काश्मिरी पंडितांवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले. पंडितांना काश्मीरमध्ये परत न केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. मी काश्मिरी पंडितांवर नव्हे तर भाजपावर हसत होतो, असे त्यांनी सांगितले.

काश्मीर फायलींबाबत विधानसभेत काय बोलले होते हे स्पष्ट करताना अरविंद केजरीवाल यांनी टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. “हे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. काश्मिरी पंडितांवर मोठा अन्याय झाला. ही एक मोठी शोकांतिका होती. काश्मीर पंडितांच्या पलायनाला ३२ वर्षे झाली आहेत, कोणत्याही संवेदनशील सरकारने त्यांना न्याय दिला असता. त्यांनी पुनर्वसनाची व्यवस्था करायला हवी होती. त्यांनी तेथे जमीन देऊन धोरण बनवायला हवे होते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Kejriwal Arrest Case
केजरीवाल अटक प्रकरण : ‘आप’च्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईतील हवाला ऑपरेटरमार्फत पैसे पाठवले – ईडी

भाजपावर निशाणा साधत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘भाजपासाठी काश्मीरच्या फाइल्स महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी काश्मिरी पंडित जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा पंडित काश्मीरमधून स्थलांतरित झाले, तेव्हा १९९३ मध्ये दिल्लीतील २३३ कंत्राटी शिक्षक म्हणून दिल्ली सरकारमध्ये सामील झाले होते. आमचे सरकार आल्यावर आम्ही २३३ शिक्षकांना कायम केले. एवढ्या वर्षात काँग्रेसचे सरकार होते पण त्यांच्यासाठी काही केले नाही. या हंगामी शिक्षकांना आम्ही कायम केले. तेव्हापासून सर्व जुनी देयके देण्यात आली. आम्ही त्याच्यावर चित्रपट बनवला नाही.”

सर्वांनी पक्षांनी उठून त्यांना घरी पाठवण्याची, अशी माझी मागणी होती. त्यांच्या नावावर चित्रपट करून कोटींची कमाई करणे योग्य नाही, असे केजरीवाल म्हणाले. सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात बनवल्या जात असलेल्या मीम्सला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, मी काश्मिरी पंडितांवर नव्हे तर भाजपावर हसत होतो.

अनुपम खेर यांच्या प्रतिक्रियेबाबत केजरीवाल म्हणाले की, ते एक अभिनेते आहेत आणि त्यांचे काम करत आहेत. त्यांचे चित्रपट काम करणे चुकीचे नाही. भाजपाने चित्रपटाचे केलेले प्रमोशन चुकीचे आहे.