‘सिंधुरक्षक’वर जाण्याचा दुसरा मार्ग सापडला

भारतीय नौदलाच्या सिंधुरक्षक या बुडालेल्या पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधण्यात नौदलाला यश आले आहे.

भारतीय नौदलाच्या सिंधुरक्षक या बुडालेल्या पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधण्यात नौदलाला यश आले आहे. दरम्यान, नौदलाच्या पाणडुब्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा नौदलाचे प्रयत्न सुरू असून अद्याप आणखी काही माणसांचे मृतदेह मिळतात का याचा शोध घेत आहेत.
मागील बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग पाण्याखाली बुडाल्याने तसेच उच्च तापमानामुळे बंद झाला होता. पाणबुड्यांनी पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधून काढला आहे. यामध्ये अडकलेल्या अठरा जणांपैकी आतापर्यंत पाचजणांचे अतिशय भाजलेल्या अवस्थेतील मृतदेह नौदलाच्या मदत पथकाने बाहेर काढले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ins sindhurakshak five bodies recovered divers open second access to submarine

ताज्या बातम्या